ओमिक्रॉन तपासणी अहवाल येण्यापूर्वीच रुग्णाचा ह्रदयविकाराने मृत्यू

नायजेरिया येथून आलेल्या व्यक्तीचा ओमिक्रॉन तपासणी अहवाल गुरुवारी (ता. ३०) पॉझिटिव्ह आला.
Omicron variant
Omicron variantSakal media
Summary

नायजेरिया येथून आलेल्या व्यक्तीचा ओमिक्रॉन तपासणी अहवाल गुरुवारी (ता. ३०) पॉझिटिव्ह आला.

पिंपरी - नायजेरिया येथून आलेल्या व्यक्तीचा ओमिक्रॉन तपासणी (Omicron Checking Report) अहवाल गुरुवारी (ता. ३०) पॉझिटिव्ह (Positive) आला. मात्र, त्यापूर्वीच मंगळवारी (ता. २८) त्यांचा वायसीएम रुग्णालयात ह्रदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने मृत्यू झाला होता, असे महापालिकेचे सहायक अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी कळविले आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील अन्य दोघांचे ओमिक्रॉन तपासणी अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत.

Omicron variant
पुणे : 31 डिसेंबर व 1 जानेवारीनिमित्त वाहतुकीत बदल

परदेशातून आलेले व त्यांच्या संपर्कातील एक हजार ५९१ जणांची आजपर्यंत तपासणी केली आहे. त्यापैकी एक हजार ४९५ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून एक हजार ४३७ जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. परदेशातून आलेल्या ३२ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यातील १४ व त्यांच्या संपर्कातील ११ अशा २५ जणांना ओमिक्रॉन संसर्ग झाला आहे. त्यातील १५ जण बरे होऊन घरी गेले आहेत. अन्य रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असेही डॉक्टर गोफणे यांनी कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com