औंध जिल्हा रूग्णालयातील आयसीयूमधून रूग्णाचा मोबाईल चोरीला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

औंध जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली.

पिंपरी : औंध जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी हजरतअली म. इसाक पठाण (वय 48, रा. दत्तनगर, वाकड) यांनी फिर्याद दिली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

फिर्यादी यांचे भाऊ युसुफअली पठाण (वय 46) हे औंध जिल्हा रूग्णालयात कोरोना आयसीयू वॉर्डमध्ये ऍडमीट होते. दरम्यान, 22 ऑगस्टला सायंकाळी सहा ते 23 ऑगस्ट सकाळी नऊ या कालावधीत त्यांचा बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल आयसीयू वॉर्डमधून चोरीला गेला. उपचारादरम्यान 27 ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला.

मोबाईल चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी युसुफअली यांचे भाऊ हजरतअली यांनी गुरूवारी (ता.17) सांगवी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. दरम्यान, रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणीसह येथील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली जात असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: patient's mobile stolen from ICU of Aundh District Hospital