Pavanathadi Jatra : महिला बचतगट पवनाथडी जत्रा स्टॉलसाठी पालिकेच्या नविन नियमांमुळे महिलांची तारांबळ

महापालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येत आहे.
Pavanathadi Jatra
Pavanathadi Jatrasakal
Updated on

जुनी सांगवी - महापालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या नागर वस्ती विभागाकडून बचत गटातील महिलांना स्टॉल उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज वाटप व स्विकृती सुरू आहे.

मंगळवार ता. २ अर्ज स्वीकृतीची मुदत देण्यात आल्याने महिलांची कागदपत्रांची जुळवाजुळव, पालिकेकडे करण्यात आलेली बचत गटांची नोंदणी क्रं. नसल्याने महिलांची तारांबळ होत आहे. सोमवार ता. १ अनेक अर्ज बचतगटाची नोंदणी पालिकेकडे नसल्याने अर्ज परत पाठवण्यात आल्याने महिला वर्गांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

गृहिणी ते उद्योजक असा आर्थिक चळवळीचा प्रवास उभारणा-या पवना थडी यात्रेतून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करण्यात आलेले आहे. मात्र यावर्षी अर्जात मागील वर्षीपेक्षा अधिक नियम, अटी व शर्ती लादल्याने बचत गटातील महिलांनी नाराजी व्यक्त करत आहेत. अनेक महिला बचतगट नवखे आहेत. त्यांची पालिकेकडे नोंदणी नाही.

खाद्य पदार्थ विक्रीसाठी नव्याने फुड लायन्स परवाना अट घातल्याने याबाबत महिला बचत गटातील महिलांकडे फुड लायसन्स परवाना नाही. नवीन गट नोंदणीसाठी गटातील महिलांचे आधार कार्ड, सही अर्जावर आवश्यक आहे. गटातील काही सदस्य कष्टकरी, कामगार आहेत. कुणी गावी गेलेले आहेत. काही सदस्यांकडे स्मार्ट फोन नाहीत.

बचत गटांच्या नोंदणीसाठी सर्व सदस्य एकावेळी उपलब्ध होवू शकत नसल्याने गटातील गटप्रमुख अथवा एक गट सदस्याकरवी नोंदणी करण्यात येवून पालिकेकडे नोंदणी व स्टॉल मिळण्यासाठी अर्ज स्वीकृतीची मुदत वाढवून द्यावी अशी महिला वर्गातून मागणी होत आहे.

पालिकेने नवीन नियम काढल्याने महिलांची तारांबळ होत आहे. गट स्थापना करतानाच पालिकेने संबंधित बॅंकांना कळवून महिला बचत गटांची स्वतः कडे नोंदणी करायला हवी.ते सोयीस्कर ठरेल.सध्या अनेकांची नोंदणी नसल्याने महिलांचा वेळ वाया जात आहे.स्टॉल मिळण्यापासून ते स्टॉल लावण्याच्या तयारीसाठी महिलांना वेळ द्यावा लागतो.याचा विचार करून अर्ज स्वीकृती मुदतवाढ द्यावी.

- शितल प्रशांत शितोळे, अध्यक्षा शिव जिजाऊ महिला प्रतिष्ठाण सांगवी.

अनेक गट सामाजिक संस्थेशी जोडलेले आहेत.पिंपरी चिंचवड हद्दीतील महिलांना प्राधान्याने स्टॉल मिळावेत.

- स्मिता बाळासाहेब भोसले, अध्यक्षा ओम साई महिला बचत गट सांगवी.

अटी व नियमांबाबत काही अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत. पवनाथडी यात्रेत महिला बचत गट सदस्यांनाच संधी मिळावी यासाठी नोंदणी नियमाची पारदर्शकता आहे. सर्व बचतगटांनी यात सहभागी व्हावे.नविन बचत गटांनी संबंधित विभागाकडे नोंदणी करावी. तात्काळ नोंदणी पुर्तता करण्यात येते.सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकंदरीत परिस्थिती पाहून मुदतवाढीचा विचार करण्यात येईल.

- अजय चारठणकर, समन्वय अधिकारी तथा उपायुक्त समाज विकास विभाग महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jigyasa Resource Centre disburses Rs 9.99 crore loans to 120 self help groups in Ambegaon and Khed with 100 percent recovery
two levels of mental illness women empowerment
Nanded
Engineering Admission
Marathi News Esakal
www.esakal.com