esakal | पवनानगर : पवना नदीवरील थुगाव पुलावरून होतोय धोकादायक प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri

पवनानगर : पवना नदीवरील थुगाव पुलावरून होतोय धोकादायक प्रवास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पवनानगर : थुगाव आणि बऊरला जोडणारा कोल्हापूर पद्धतीचा साकव पूल ऑगस्ट (ता. २७) पाण्याने प्रवाहाने पूलाचे दोन खांब वाहून गेल्याने कोसळला होता. कोसळला तेव्हापासून हा साकव पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे परंतु परिसरातील नागरिकांना कडधे, करूंज, बऊर यामागे वळसा घालून किंवा शिवणे, बेबडओहोळ, उसे असा वळसा घालून जावे लागत असल्याने अनेक नागरीक जीवघेणा प्रवास करुन धोकादायक पध्दतीने वाहत्या पाण्यावरील पुलाच्या प्लेटीवरुन जीव मुठीत प्रवास करत आहे.

या पुलासाठी १५ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला असून त्याची केवळ निविदा प्रक्रिया बाकी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या पुलाचे काम त्वरीत सुरु करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

loading image
go to top