esakal | पवना धरणाच्या पाणी पातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

पवना धरण

धरण पाणलाेट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे धरण पाणी पातळीमध्ये वाढ हाेत आहे.

पवना धरणाच्या पाणी पातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - धरणाच्या सांडव्यावरुन आज (गुरुवार) सायंकाळी चार वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यामुळे धरणाच्या खालील बाजुस नदी काठावरील सर्व गावातील नागरीकांना अतिदक्षतेचा इशारा, जलसंपदा विभागाने दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला मावळ तालुक्यातील पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. आजअखेर धरणात ८५ टक्के पाणी साठा झालेला आहे. हवामान अंदाजानुसार धरण पाणलाेट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे धरण पाणी पातळीमध्ये वाढ हाेत आहे.

पवना धरणातून दुपारी चारच्या सुमारास पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यात विद्यूत जनित्रा द्वारे १४०० क्युसेक, सांडव्याद्वारे २१०० क्युसेक असे मिळून ३५०० क्युसेक पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील नागरीकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा: कोंडीमुळे डांगे चौकाचा श्‍वास कोंडला; वाहनचालक त्रस्त

धरणामध्ये हाेणारी पाण्याची आवक पाहता धरणाच्या सांडव्यावरुन आज (गुरुवार) सायंकाळी चार वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे पवना धरणाच्या खालील बाजुस नदी काठच्या सर्व गावातील नागरीकांनी दक्ष राहुन नदी काठावरील त्यांचे सर्व जनावरे, माेटारी, अवजारे व इतर सामुग्री त्वरीत सुरक्षित हलविण्यात यावे. जेणेकरून कुठलीही जिवित व वित्तहानी हाेणार नाही याची काळजी घेऊन सहकार्य करावे, अशी विनंती जलसंपदा विभागाने केली आहे.

loading image
go to top