स्मार्ट इंडिया हॉकेथॉन स्पर्धेत पीसीसीओई देशात प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PCCOE

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी येथे आयोजित "स्मार्ट इंडिया हॉकेथॉन"च्या ग्रँड फिनालेत हार्डवेअर एडिशनमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.

स्मार्ट इंडिया हॉकेथॉन स्पर्धेत पीसीसीओई देशात प्रथम

पिंपरी - 'स्मार्ट इंडिया हॉकेथॉन (एसआयएच) २०२२" राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (पीसीसीओई) वॉटर गार्डियन्स संघाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी 'स्मार्ट ऑटोमेशन श्रेणी अंतर्गत' 'स्मार्ट शहरांमध्ये पाण्याच्या वापराचा मागोवा घेण्यासाठी आणि मर्यादित करण्यासाठी स्मार्ट सिटी वॉटर मॅनेजमेंट सिस्टम" हा लक्षवेधक प्रकल्प सादर करत एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी येथे आयोजित "स्मार्ट इंडिया हॉकेथॉन"च्या ग्रँड फिनालेत हार्डवेअर एडिशनमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. प्रतीक शेट्टी हा "वॉटर गार्डियन्स" संघाचा कॅप्टन होता. सोहेल शेडबाळे, राशी राठी, रुद्रेश श्रीराव, राधिका डोईजड यांचा संघात समावेश होता. त्यांना प्रा. प्रकाश सोनटक्के आणि प्रा. वैशाली पाटील यांनी मार्गदर्शन केले.

ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनने स्पर्धेचे आयोजन केले होते. ही एक देशव्यापी उत्पादन विकास स्पर्धा आहे. यामध्ये स्पर्धकांना दररोज अनुभवात येणाऱ्या सर्वात मोठ्या आव्हानांवर सर्जनशील उपाय शोधण्यास सांगितले होते.

विजेत्या स्पर्धकांचे आणि मार्गदर्शकांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी अभिनंदन केले.

Web Title: Pccoe First In Country In Smart India Hackathon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..