Pimpri Chinchwad Municipal Corporation Election
sakal
- अमोल शित्रे
पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट सामना रंगत आहे; तर काही माजी नगरसेवक विविध पक्षांतून, तर काही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपचे अनेक माजी; आणि भाजपने तिकीट नाकारलेले काही माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे काही लढती अधिकच चुरशीच्या होण्याची चर्चा आहे.