Aparna Doke
sakal
पिंपरी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर अपर्णा डोके चिंचवडगाव प्रभाग १८ मधून इच्छुक होत्या. त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी निश्चित होती. त्यांचा एबी फॉर्मही (अधिकृत उमेदवारी) तयार होता. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या काही मिनिटांत भूमिका बदलली आणि भारतीय जनता पक्षाकडून अर्ज दाखल केला. या माध्यमातून राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपने मोठा धक्का दिल्याची चर्चा आहे. याच प्रभागातून इच्छुक असलेले माजी नगरसेवक राजेंद्र गावडे यांना भाजपने डच्चू दिला आहे.