water issue in pimpri chinchwad
sakal
पिंपरी - ‘गेल्या सहा वर्षांपासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. भामा-आसखेड प्रकल्पातून पाणी अद्याप आलेले नाही. टॅंकरचा आधार घ्यावा लागत आहे. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च होत असून, टॅंकर लॉबी सुसाट आहे, अशा मूलभूत प्रश्नांवर बोलण्याऐवजी महापालिका निवडणुकीतील उमेदवार व पक्षांचे नेते आरोप-प्रत्यारोपांत मश्गुल आहेत. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन त्यांनी त्याविषयी बोलावे,’ असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील उमेदवारांसह त्यांच्या पक्षनेत्यांना नागरिकांनी केले आहे.