

PCMC Election
Sakal
पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. १५) शांततेत मतदान झाले. काही केंद्रांवर सायंकाळीही रांगा लागल्या होत्या. साडेपाच वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर प्रवेश केलेल्या सर्व मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता आला.
३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सुमारे ६० टक्के मतदान झाले. शहरातील दोन हजार ६७ केंद्रांवर सुमारे सव्वादहा लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. काही केंद्रांवरील अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.