
वाकड : चिंचवड-डांगे चौक-हिंजवडी मार्गात काळाखडक झोपडपट्टीतील अतिक्रमणे महापालिकेने बुधवारी (ता. १६) हटविली. या कारवाईनंतर जमा झालेले बांधकाम साहित्य व राडारोडा उचलण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. तर, येत्या दोन दिवसांत प्रत्यक्ष रस्ता रुंदीकरण सुरू केले जाणार आहे.