PCMC News : विसर्ग सुरू; पवना, मुळा नद्यांच्या पातळीत वाढ; सखल भागांसह काठालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

River Water Level : पवना आणि मुळशी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने पवना व मुळा नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
PCMC News
PCMC NewsSakal
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसर तसेच धरण क्षेत्रांत संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पवना व मुळशी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. या धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील पवना आणि मुळा या दोन्ही नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणेला दक्ष राहण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत. तसेच, नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन देखील आयुक्तांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com