
राहुल हातोले
पिंपरी : पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात मेट्रो सेवेला प्रवाशांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरू झालेली ‘फीडर बस’ सेवा अपुरी पडत आहे. परिणामी, प्रवाशांना खासगी वाहतुकीचा पर्याय निवडणे भाग पडत आहे. यात रिक्षाचालकांचे फावते.