
पिंपरी : उद्योगनगरीच्या पश्चिम पट्ट्यात अर्थात वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी या भागासह लगतच्या जांबे, सांगवडे, मामुर्डी, नेरे, गहुंजे, कासारसाई भागांत मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारले जात आहेत. हा भाग पुणे - मुंबई द्रुतगती मार्ग आणि मुंबई - बंगळुरू महामार्गामुळे (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) जोडला आहे. त्यात आता रिंगरोड बरोबरच मेट्रो मार्गाची भर पडणार असून पुणे - मुंबई महामार्गावरील निगडी आणि पुणे - नाशिक महामार्गावरील भोसरी, मोशी, चाकणला ‘कनेक्टिव्हिटी’ वाढणार आहे.