Pimple Gurav News
Sakal
पिंपरी-चिंचवड
Pimple Gurav News : सीमाभिंत तोडल्याने भूखंडावर बेकायदा पार्किंग, काटेपूरम चौकाजवळील जागा, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न
PCMC News : पिंपळे गुरवमध्ये सीमाभिंत पाडल्यानंतर आरक्षित भूखंडावर कचरा, बेकायदेशीर पार्किंग आणि मद्यधुंदी सुरू असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पिंपळे गुरव : काटेपुरम चौक येथील जलतरण तलावाशेजारील मोकळ्या आरक्षित भूखंडाभोवतीच्या सीमाभिंतीचा काही भाग ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाने पाडून टाकल्याने भूखंडावर मोठ्या प्रमाणात बांधकामातील राडारोडा, प्लास्टिक आणि घरगुती कचरा तेथे टाकला जात आहे. याशिवाय सर्रास बेकायदा पार्किंग आणि रात्रीच्या वेळेस वाहनांच्या आड मद्यपी आश्रय घेत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर स्वरूप धारण करत आहे.