Bhosari MIDCSakal
पिंपरी-चिंचवड
PCMC News : रस्त्यांच्या डागडुजीचे पुन्हा ‘पितळ उघडे’,भोसरी, दिघी, इंद्रायणीनगरात खड्डे; पादचारी, वाहनचालक त्रस्त
Bhosari MIDC : भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर व एमआयडीसी परिसरातील खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे हाल होत असून, तात्पुरत्या उपायांवर संताप व्यक्त होत आहे.
भोसरी : भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर आणि भोसरी एमआयडीसी परिसरात खड्ड्यांमुळे समस्या वाढल्या आहेत. खड्डे चुकवताना वाहनचालकांचे अपघातही होत आहेत. त्यामुळे आतातरी रस्त्यांची चांगली डागडुजी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.