पिंपरी : अनेक करदात्यांनी महापालिकेकडे धनादेशाद्वारे मिळकतकर भरला आहे. मात्र, अनेकांचे धनादेश वटलेले नाहीत. त्यांच्यावर मिळकती सील करणे, नळजोड तोडणे अशा स्वरूपाची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे..मिळकतकर संकलनासाठी महापालिकेच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत प्रयत्न सुरू आहेत. चालू आर्थिक वर्षात नागरिकांना कर भरण्यासाठी विविध सुलभ सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. एक एप्रिल ते ३० जूनपर्यंत ऑनलाइन कर भरणाऱ्यांना १० टक्के सवलत दिली होती. त्याचा लाभ घेत चार लाख २८ हजार १६ जणांनी १६ जुलैपर्यंत तब्बल ५४४ कोटी रुपये करभरणा केला आहे. आता ३० सप्टेंबर ऑनलाइन कर भरणाऱ्यांना चार टक्के सवलत दिली आहे..शिवाय, कर वसुलीसाठी १८ विभागीय कार्यालयांमार्फत लिपिक, गट लिपिक, सहायक मंडलाधिकारी अशा एकूण २० कर्मचाऱ्यांच्या पथकांकडून टेलिकॉलिंगच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संवाद साधून कर भरण्याचे आवाहन केले जात आहे.तसेच थकबाकीदारांना टेलिकॉलिंग, मेसेज, व्हीएमडी, सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून जागृती केली जात आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे..ऑनलाइन कर भरणा मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही नागरिकांना अधिकाधिक सवलतीसह ऑनलाइन कर भरण्यासाठी प्रोत्साहन देत राहू. तीन लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी ऑनलाइन कर भरला आहे. महापालिकेच्या ऑनलाइन सेवेमुळे नागरिकांना घरबसल्या कर भरण्याची सुविधा मिळते.- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त.धनादेश न वटल्यास कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकीदारांविरोधात मालमत्ता जप्ती, नळजोड खंडित करणे अशी कारवाई करत आहोत. अशी कटू कारवाई टाळून नागरिकांनी वेळेत कर भरावा.- अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त.असा झाला करभरणाकरभरणा पद्धत कररक्कम (कोटी रुपयांत)ऑनलाइन ३३९४.३३रोख ३२.७०धनादेश २५.६१ईडीसी ०.६आरटीजीएस २४.६२डीडी ०.७४बीबीपीएस ०.१७.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.