
पिंपळे गुरव : पिंपळे गुरव परिसरात मातृत्वाला कलंकित करणारी घटना नुकतीच घडली. प्रखर उन्हात रस्त्यालगतच्या उघड्या मैदानात अंगावर एकही वस्त्र नसलेल्या पाच दिवसांच्या निष्पाप नवजात अर्भकाला फेकून देण्यात आले. या प्रकरणी, सांगवी पोलिसांनी कौशल्याने तपास करुन निर्दयी माता-पित्यांना अटक केली. मात्र, दांपत्याच्या या अमानुष कृत्याने त्या नवजातसह अन्य दोन चिमुकल्या मुलांचेही छत्र हिरवले जाणार आहे.