PCMC Traffic Police : सलाम! वाहतूक पोलिसांच्या हाती फावडे; बुजवले खड्डे, आयुक्तांकडून कौतुक

Traffic Police
Traffic PoliceSakal

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका सध्या प्रशासकांच्या हातात असल्यामुळे खड्डे बुजवण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी आता थेट वाहतूक पोलिसांनीच फावडे हातात घेऊन खड्डे बुजवण्यास सुरूवात केली आहे.

वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करता करता या कर्मचाऱ्यांनी खड्डे बुजवण्याचे काम हातात घेतल्यामुळे या कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. पोलिस दलातील इतर सदस्यांनी या पोलिस कर्मचाऱ्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्तांनी हे फोटो अधिकृत ट्वीटर हँडलवर शेअर केले आहेत.

Traffic Police
Pune Metro Video : पुण्यातील शिवाजीनगर मेट्रो स्थानकाची झलक! मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

"आमच्या पोलिस अंमलदारांनी नागरिकांच्या सोयीसाठी चाकोरीबाहेर जाऊन जे कर्तव्य बजावले त्या संबंधीची ही छायाचित्रे पाहुन आनंद झाला त्यांच्या कर्तव्यपरायणतेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.पोलीस दलातील इतर सर्व सदस्यांनी याचा आदर्श घेऊन परिपूर्ण क्षमतेने नागरिकांना ऊत्तमोत्तम सेवा द्यावी." असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

दरम्यान, आयुक्तांनी शेअर केलेल्या या फोटोवर पिंपरी चिंचवडकरांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. "महापालिका प्रशासन काय झोपले आहे काय? पोलिसांनी हातात फावडे घेण्याची वेळ आली आहे, कौतुकास्पद कार्यक्रम" अशा प्रतिक्रिया सुद्धा नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com