
पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कला जोडणाऱ्या डांगे चौक ते चिंचवड रस्त्यातील पदपथांचा ‘अर्बन स्ट्रीटस्केप’ अंतर्गत विकास करण्यात येत आहे. दरम्यान, डांगे चौकाजवळ चेंबरची दुरुस्ती करण्यासाठी खोदकाम केले असून याचा सार्वजनिक वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनचालकांची गैरसोय होत आहे.