पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी २२ ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभागरचना जाहीर केली आहे. त्यावर चार सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना मागवल्या आहेत. गेल्या पाच दिवसांत प्रभाग आठ इंद्रायणीनगर भोसरी आणि प्रभाग २१ बाबत प्रत्येकी एक हरकत व सूचना नोंदवण्यात आली आहे. .महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रारुप प्रभागरचना नकाशासह प्रसिद्ध केली आहे. महापालिका भवनाच्या आवारात तसेच, आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या आवारातही नकाशे व माहिती प्रसिद्ध केली आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीप्रमाणेच प्रभागरचना आहे..चक्रपाणी वसाहत परिसर मोशी-चऱ्होलीतभोसरी : भोसरीतील चक्रपाणी वसाहतीतील सुमारे साडेतीन हजार मतदारसंख्येचा भाग मोशी-चऱ्होली प्रभाग तीनला जोडला आहे. त्यामुळे नागरिकांत काहीशी नाराजी आहे. या प्रभागात मोशी आणि चऱ्होलीतील उमेदवार निवडून येत असल्याने नागरिकांशी संपर्क साधताना त्यांना अवघड होते. भाग सलग असलेल्या प्रभाग पाचला जोडण्याची मागणी आहे. .यात चक्रपाणी वसाहतीतील अक्षयनगर, आनंदनगर, संत तुकारामनगर, बावन्न खोल्या परिसराचा समावेश आहे. या भागात ‘रेडझोन’ हद्दीचाही समावेश आहे. चऱ्होली- मोशी- चक्रपाणी वसाहत या त्रिकोणातील रेडझोन असल्याने हा भाग नागरीवस्ती विरहीत आहे. तसेच, प्रभाग पाच व सहामध्ये चक्रपाणी वसाहतीचा उर्वरित भाग आहे. त्यांना हा भाग जोडल्यास भौगोलिकदृष्ट्या सलगता येईल. हा प्रभाग भौगोलिकदृष्ट्या सर्वांत मोठा असल्याने चक्रपाणी वसाहतीतील नागरिक हरकत नोंदविण्याच्या तयारीत आहेत..Pune Traffic News : कोंडी फोडण्यासाठी आणखी एक मार्गिका; पुणे विमानतळावरील एरोमॉलमध्ये चारचाकीची मार्गिका वाढणार.अशा आहेत हरकती सूचनाप्रभाग आठचे (भोसरी इंद्रायणीनगर) नाव इंद्रायणीनगर व संतनगर असे असावेप्रभाग २१ मध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असल्याने प्रभाग राखीव करावा.प्रभागरचनेवर महापालिका भवनातील तळमजल्यावरील निवडणूक कार्यालयात तसेच, सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांत हरकती व सूचना स्वीकारण्यात येत आहेत. आतापर्यंत दोनच हरकती आल्या आहेत. मतदान केंद्र निश्चितीची कार्यवाही सुरू केली आहे.- अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग, महापालिका.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.