पावसाळा म्हटला, की पिंपरीकरांच्या अंगावर काटा उभा राहतो; काय आहेत त्या आठवणी...

पावसाळा म्हटला, की पिंपरीकरांच्या अंगावर काटा उभा राहतो; काय आहेत त्या आठवणी...

पिंपरी : एकीकडे कोरोनाचे संकट उभे आहे. तर दूसरीकडे पावसाळा तोंडावर आल्याने नदीकाठच्या परिसरातील पूरबाधितांच्या अंगावर काटे उभे राहिले आहेत. शहरात गतवर्षी पावसाने थैमान घातल्याने पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना भीषण पूरसंकटाचा सामना करावा लागला. तब्बल नऊ गावातील साडेचार हजारांहून अधिक कुटुंबाचे स्थलांतर झाले. मात्र, या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार असल्याने प्रशासन आतापासूनच सज्ज झाले आहे.

पवना, इंद्रायणी व मुळा नद्या दुथडी भरून वाहिल्याने अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले. चौदा हजार क्‍युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पावसाचा जोर मोठा असल्याने पवना आणि मुळशी धरणही पूर्ण क्षमतेने भरले होते. अनेक गावांचा संपर्क तुटला. अद्यापही ती कुटुंबे पुराच्या धक्‍क्‍यातून सावरलेली नाहीत. मात्र, कोरोना संसर्ग परिस्थितीत अतिवृष्टी झाल्यास महापालिकेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार असल्याने महापालिका प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर नुकतीच महापालिकेत आढावा बैठक पार पडली आहे. अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापनासोबतच पूर नियंत्रण कक्ष तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून, सर्व विभागांना कामाचे वाटप करण्यात आले आहे. गतवर्षी पुरात अडकलेल्या 49 जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले होते. वाहतूक बंद झाल्याने काही पर्यायी रस्ते खुले करण्यात आले होते.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या केल्या होत्या उपाययोजना-

  • नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक
  • बाधित क्षेत्रातील नोंदी व पंचनामे
  • शाळा खोल्या व भोजन व्यवस्था
  • अग्निशमन विभाग व आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24x7 अलर्ट
  • वायरलेस यंत्रणा
  • 15 हजार रुपये अनुदान
  • 10 किलो धान्याचा रेशन पुरवठा


असे झाले होते बाधितांचे हाल-

  • कागदपत्रे वाहून गेली
  • धान्याची तत्काळ मदत मिळण्यात अडथळे
  • पंचनाम्याला उशीर
  • बचाव कार्यात अडथळा


यामुळे ओढावणार संकट - 

  • नदीकाठचे अतीक्रमण
  • अनधिकृत झोपडपट्ट्या
  • धोकादायक बांधकामे

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बाधित गाव, कुटुंब संख्या- 

  1. दापोडी 859
  2. रावेत 50
  3. चिंचवड 49
  4. भोसरी 382
  5. बोपखेल 64
  6. पिंपरी वाघेरे 2420
  7. पिंपळे गुरव 165
  8. रहाटणी 272
  9. सांगवी 619
  10. एकूण 4880


बाधित भाग- 

संजय गांधीनगर, बौद्धनगर, भाटनगर, आंबेडकर कॉलनी, रमाबाईनगर, शिक्षक सोसायटी, कस्पटे वस्ती, पवना वस्ती, गुलाबनगर- दापोडी, रतिकलाल भगवानदास वसाहत- फुगेवाडी, हिरामण लांडगे झोपडपट्टी-कासारवाडी,आनंदवन आश्रम, अशोक हॉटेल परिसर, मुळानगर, सांगवी, मधुबन.


हे रस्ते झाले होते बंद- 

  • औंध-सांगवी-हिंजवडी रस्ता
  • सांगवी बुद्धविहारमार्गे जाणारा पूल
  • सांगवीहून स्पायरला जाणारा पूल
  • वाकड नाका ते कस्पटे वस्ती
  • पिंपळे निलख ते कस्पटे वस्ती
  • सांगवी सृष्टी ते कासारवाडी
  • पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक


पूर नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आपत्ती नियंत्रण व अग्निशमन विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नाले सफाईचे काम सुरू आहे. कोरोनाच्या कालावधीत नागरिकांना संरक्षण देणे आमचे आद्य कर्तव्य आहे. संसर्गाचा बाऊ करण्याचे कारण नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी.

- संतोष पाटील, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com