पिंपरीच्या पायलट लेकीचा कोरोनविरोधात असाही लढा; करतेय असं मोलाचं काम...

सुवर्णा नवले
शुक्रवार, 15 मे 2020

- महिला हवाई वॉरिअरचा देशभरात औषध पुरवठा

पिंपरी : कोरोना विरुध्दच्या रणांगणात प्रत्येकालाच लढा द्यावा लागतोय. तसाच लढा हवाई वॉरिअर्सचाही आहे. लॉकडाऊन जाहीर झालेल्या दिवसापासून देशभरात औषधे पुरविण्याचे काम वैमानिक "आकांक्षा" करत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी गावातील कॅप्टन आकांक्षा दिलीप कुदळे. महापालिकेचे दिवंगत अभियंता दिलीप गुलाबराव कुदळे यांची ती कन्या. आई गृहिणी आहे. कोवीड-19 या आणीबाणीच्या परिस्थितीमधे कोवीड योद्धा म्हणून देशात वेगवेगळ्या ठिकाणी औषधे आणि इतर तत्सम जीवनावश्यक साहित्य हवाई मार्गाने पोहोचवण्यासाठी वैमानिक या रुपाने आकांक्षा देशसेवा करत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वडिलांचे निधन होऊन काही वर्षे लोटली; पण न डगमगता 2012 पासून ती या क्षेत्रात पाय रोवून उभी आहे. पुण्यातील स्पाइस जेटच्या माध्यमातून औषध सेवा देण्याचे काम सध्या करत आहे. आतापर्यंत तिने चेन्नई, कोईमतूर, मधुराई, बंगळूर या ठिकाणी दोन वेळा औषध पुरवठा केला आहे. दिवसभरात कोणत्याही वेळेत ती हवाई सेवा देण्यासाठी सज्ज असते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गावात असूनही कधी गावाच्या मानसिकतेप्रमाणे न राहता शिक्षण घेतलं. संसर्गाच्या भयानक परिस्थितीमध्ये आम्ही देखील जोखीम स्वीकारत आहे. पण सॅनिटायझर, मास्क आणि स्वछता आम्ही बाळगत आहोत. नवीन शहर आणि वातवरणाशी जुळवून घेत आहोत. रोज मी आमचे विमान सेवक व स्वच्छता कर्मचारी यांचे देखील आभार मानते. कारण तेदेखील योद्धा आहेत.

- आकांक्षा कुदळे, वैमानिक, पिंपरी गाव.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Pilot Girl of Pimpri Contributed in Corona Situation