पिंपळे गुरवमध्ये प्राणघातक हल्ल्याच्या दोन घटना

पिंपळे गुरव हदरले कोयता, पालघनने हल्ला
Pimple Gurav crime update Two incidents of assault Seven people were injured crime against 14 persons Sangvi police station
Pimple Gurav crime update Two incidents of assault Seven people were injured crime against 14 persons Sangvi police stationsakal
Updated on

पिंपरी : पिंपळे गुरव येथे दीड तासांच्या अंतरात कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या दोन घटना घडल्या. या दोन वेगवेगेळ्या घटनेत सात जण जखमी झाले असून चौदा जणांवर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाठोपाठ घडलेल्या या घटनांमुळे पिंपळे गुरव हदरले. पहिल्या घटनेत दीपक लुंडा कोकाटे (रा. साठ फुटी रोड , मोरया पार्क, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल उर्फ कांड्या पप्या काशीद , सचिन उर्फ टकल्या मेजर कोळेकर, शाम हिंगे, प्रसाद सोनटक्के , दीपक बागडे, पप्प्या गायकवाड, मनोज सरकार, भावेश सरकार, प्रसाद कदम, खडया साळुंके (सर्व रा. पिंपळे गुरव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

तर या हल्ल्यात फिर्यादीसह राज अनिल पाटील (रा. पिंपळे गुरव), किशोर वसंत काटे, अभिषेक बारटक्के, मतीन शेख (सर्व. रा दापोडी) हे जखमी झाले. फिर्यादी हे शनिवारी (ता. १६) रात्री अकराच्या सुमारास मित्रांसह पिंपळे गुरव परिसरात फिरत होते. काशिदनगर येथून जात असताना आरोपींनी त्यांना थांबविले. जुन्या भांडणाच्या रागातून शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. त्यानंतर टोळक्याने राज पाटील, किशोर काटे, मतीन शेख, अभिषेक बारटक्के यांच्यावर कोयता व पालघनने वार केले. सिमेंटच्या गट्टूनेही मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. तसेच कोशोर काटे याच्या दुचाकीचे कोयता व सिमेंट गट्टू मारून नुकसान केले.

तर दुसऱ्या घटनेप्रकरणी रोहित डॅनियल तोरणे (रा. ओंकार कॉलनी, नवले चौकाजवळ, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम सावंत (रा. दापोडी), प्रमोद भोसले, जोसेफ, तेजस यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत फिर्यादीसह निलेश पत्री हे जखमी झाले आहेत. फिर्यादी हे रविवारी (ता. १७) मध्यरात्री त्यांच्या घरासमोर बसले होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून तेथे आले. दहशत करण्यासाठी आरोपी शुभमने फिर्यादी यांचा मित्र निलेश पत्री यांच्यावर कोयत्याने वार केला. दरम्यान, फिर्यादी हे घाबरून पळून जात असताना शुभमने त्यांच्यावरही कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केला. तसेच जोसेफ व तेजस यांनी फिर्यादी याना फायटरने तर प्रमोद भोसलेने सिमेंटच्या ब्लॉकने बेदम मारहाण केली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. या दोन्ही घटनेप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com