Pimpri Chinchwad crime : सिमकार्ड, सीसीटीव्ही अन् तांत्रिक विश्लेषणातून खुनाचा उलगडा; पिंपळे गुरव प्रकरणातील आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी

Pimple Gurav Murder Case : दारूच्या नशेत झालेल्या वादातून मित्राची हत्या केल्याचा प्राथमिक तपासात निष्कर्ष आहे. सिमकार्ड, सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणातून सांगवी पोलिसांनी १२ तासांत खुनाचा उलगडा केला.
Sangvi police solve the Pimple Gurav murder case within 12 hours.

Sangvi police solve the Pimple Gurav murder case within 12 hours.

esakal

Updated on: 

पिंपरी चिंचवड : पिंपळे गुरव येथील मित्राच्या निर्घृण खुनाप्रकरणी आरोपीला पिंपरी न्यायालयाने बुधवारपर्यंत (ता. ११) पोलिस कोठडी सुनावली आहे. मित्राने दारूच्या नशेत झालेल्या वादातून त्यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, मृत व्यक्तीजवळील सिमकार्ड, सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणामधून सांगवी पोलिसांनी खुनाचा अवघ्या १२ तासांत उलगडा केला.

Loading content, please wait...