पिंपरी : चोरीच्या १९ दुचाकी जप्त

दोन अल्पवयीन मुलांसह तिघे जेरबंद
पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी.
पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी. sakal

पिंपरी: वाहन चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना हिंजवडी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून १४ गुन्हे उघडकीस आले असून १९ दुचाकी जप्त केल्या आहेत. मांरुजीतील शिंदेवस्ती येथून दोन मुलांनी शिंदेवस्ती एक गाडी चोरली असून ते गाडी घेऊन हिंजवडीतील शिवाजी चौकात येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली.

पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी.
पिंपरीत दोन कुटुंबात हाणामारी

त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी हिंजवडी, वाकड, तळेगाव-दाभाडे व पुण्यातील डेक्कन येथून दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले.

तर दुसऱ्या कारवाईमध्ये गस्ती दरम्यान हिंजवडी पोलिसांनी गोविंद शंकर धाड (वय २५, रा. वाकड, मूळ-यवतमाळ) याला अटक केली. त्याच्याकडून हिंजवडी येथून चोरीला गेलेली दुचाकी जप्त केली. दरम्यान, या तिन्ही चोरट्यांकडून दहा लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या १९ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.

पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी.
कामगार उपायुक्तांचे बांधकाम व्यावसायिकाला काम बंद करण्याचे आदेश

यामध्ये हिंजवडी ठाण्यातील दहा, वाकडमधील दोन, तळेगाव दाभाडे व डेक्कन ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण चौदा गुन्हे उघडकीस आले. तर इतर पाच दुचाकीच्या मूळ मालकांचा पोलिस शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com