esakal | Pimpri : भटक्या कुत्र्यांनी फोडली पार्किंगमधील चारचाकी
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri

Pimpri : भटक्या कुत्र्यांनी फोडली पार्किंगमधील चारचाकी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मध्यरात्री अडीचची वेळ. अचानक तीन कुत्रे पार्किंगमध्ये आले. गाडीच्या टपावर मांजर बसली होती. तिच्यासाठी ते काही वेळ भुंकत राहिले. मांजराने तेथून पळ काढला. परंतु, तीन भटक्या कुत्र्यांनी मिळून त्या चारचाकीचा फ्रंट बंपर दातांनी काही वेळातच फोडून काढला. चारचाकीवर कुत्रे उड्या मारत असल्याने सोसायटीच्या आजूबाजूचे रहिवाशी जागे झाले. घडलेला सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.निगडी सेक्टर २४ मधील, श्री अरुणकुमार रणधीर मार्ग टेल्को, ३८ या सोसायटी समोरील परिसरात हा प्रकार ४ तारखेला घडला आहे.

पार्किंग परिसरात ४ ते ५ वाहने होती. निगडी प्राधिकरण परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. बरेच प्राणीप्रेमी व नागरिकही येता-जाता या भटक्यांना अन्न देत असतात. कित्येकदा यामध्ये मांस देखील असते. परंतु, बरेचदा कुत्री उपाशी राहण्याची देखील वेळ येते. सध्या या परिसरातील नागरिक वाहन फोडण्याच्या प्रकारामुळे भयभीत झाले आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी परिसरात फिरकणे देखील अवघड झाले आहे.

निहाल इनामदार यांच्या मालकीची हे चारचाकी वाहन आहे. नेहमीप्रमाणे ते गेटच्या आत किंवा बाहेर गाडी लावतात. रात्री अचानक बंपर तुटल्याचा आवाज आल्यानंतर त्यांना जाग आली. दुसऱ्या मजल्यावरुन पळत येऊन त्यांनी कुत्र्यांना हाकलविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत गाडीचा बंपर कुत्र्यांनी बाहेर काढला होता. २०१३ साली मी ह्युडांइ कंपनीची ग्रॅंड आयटेन त्यांनी खरेदी केली. गाडीला कोणताही खर्च आला नाही. परंतु, आता या विचित्र घटनेत वाहन खराब झाल्याने इन्शुरन्स क्लेम देखील होत नाही. कारण हे नैसर्गिक कृत्य असल्याचे कंपनी सांगत आहे.

रात्री कुत्र्यांनी धुमाकूळ घातल्याने मी खडबडून जागा झालो. तोपर्यंत कुत्र्यांनी गाडीची नासधूस केली होती. दहा ते पंधरा हजार रुपये गाडीला खर्च सांगितला आहे. गाडी रिपेंट करावी लागेल. गाडी दुरुस्त होवू शकते. परंतु, जर मनुष्यहानी झाल्यास ती भरून न येणारी आहे. रात्रपाळीच्यावेळी अनेकजण नोकरीसाठी या भागातून ये-जा करत असतात. बऱ्याच जणांना बाहेर वाहने लावण्याशिवाय पर्याय नाही. कारण त्यांना पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नाही. प्राण्यांच्या आहाराच्या नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे.

निहाल इनामदार, वाहनमालक, निगडी

loading image
go to top