पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येक प्रभागात रुग्ण; मंगळवारी दिवसभरात आढळले २०४ नवीन रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 February 2021

महापालिका प्रत्येक प्रभाग (क्षेत्रिय कार्यालय) क्षेत्रात सध्या रुग्ण आहेत. त्यात मंगळवारी ‘अ’ प्रभागात १६, ‘ब’-३१, ‘क’-२३, ‘ड’-३९, ‘इ’-१६, ‘फ’-१६, ‘ग’-२७ आणि ‘ह’-३६ असे २०४ रुग्ण आढळले. जिजामाता रुग्णालयात रुग्ण दाखल केले असून, भोसरी रुग्णालयही सज्ज ठेवले आहे, असे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सांगितले.

पिंपरी - महापालिका प्रत्येक प्रभाग (क्षेत्रिय कार्यालय) क्षेत्रात सध्या रुग्ण आहेत. त्यात मंगळवारी ‘अ’ प्रभागात १६, ‘ब’-३१, ‘क’-२३, ‘ड’-३९, ‘इ’-१६, ‘फ’-१६, ‘ग’-२७ आणि ‘ह’-३६ असे २०४ रुग्ण आढळले. जिजामाता रुग्णालयात रुग्ण दाखल केले असून, भोसरी रुग्णालयही सज्ज ठेवले आहे, असे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात एकूण रुग्णसंख्या एक लाख तीन हजार ६२५ झाली आहे. आज २५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ९८ हजार ६१३ झाली आहे. सध्या तीन हजार १८० सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार ८३२ आणि बाहेरील ७७२ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १९ हजार ८२१ जणांना लस देण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या रुग्णालयांत ८४२ रुग्ण उपचार घेत आहेत. दोन हजार ३३८ रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ५४५ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील एक हजार ४०६ जणांची तपासणी केली. ८१४ जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत एक लाख ३१ हजार ५८३ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad 204 new patients found each ward on Tuesday