esakal | पिंपरी-चिंचवड शहरात पावसाची हजेरी
sakal

बोलून बातमी शोधा

rain

पिंपरी-चिंचवड शहरात पावसाची हजेरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) शहर परिसरात सोमवारी सायंकाळी सातनंतर पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली आहे. रात्री दहा वाजल्यानंतरही पाऊस सुरूच आहे. साधारण, पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर शहर परिसरात शनिवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. रविवारी सकाळपासून ऊन होते. रात्री पुन्हा पावसाला सुरुवात झाली होती. मात्र, सोमवारी सकाळपासून ऊन होते. दिवसभर ऊन-सावलीचा खेळ रंगला. सायंकाळी सातपासून पावसाला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, शुक्रवारपर्यंत (ता. १०) आकाश सामान्यतः ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मंगळवारी (ता. ७) आणि बुधवारी (ता. ८) शहर परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. शुक्रवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे, असे हवामानशास्त्र विभागाने कळविले आहे. शहरात विविध ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या टाकण्यासाठी, रस्त्यांचे काॅक्रिटीकरण, डांबरीकरण व पदपथ उभारणीसाठी खोदकाम केलेले आहे. त्याचा राडारोडा अनेक ठिकाणी पडून आहे. पावसामुळे चिखल निर्माण झाला आहे.

हेही वाचा: IND vs ENG : इंग्लंडला लगाम; टीम इंडियानं वसूल केला 'लगान'

पिंपळे सौदागर बीआरटीएस रस्ता, मानकर चौक वाकड, डांगे चौक, मोरवाडी म्हाडा वसाहत रस्ता, आकुर्डी मुख्य रस्ता आदी ठिकाणी कामे सुरू असून पावसामुळे चिखल झाला आहे. पुणे मुंबई महामार्गासह सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे.

loading image
go to top