पिंपरी चिंचवड शहरात अद्ययावत लॉजिस्टिक पार्क उभारण्याची गरज : प्रमोद भावसार

असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टस पूना नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात
Pimpri Chinchwad
Pimpri ChinchwadSakal

पिंपरी : देशाच्या औद्योगिक नकाशावर पुणे जिल्ह्याची औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, तळेगाव औद्योगिक क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प आहेत. त्यामुळे शहरात वाहतूक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर एकवटलेला आहे. काळाची गरज ओळखून पिंपरी चिंचवड शहरालगत अद्ययावत सोयींनीयुक्त लॉजिस्टिक पार्क उभारण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व संबंधीत संघटनांनी एकत्रित येऊन प्रयत्न केले पाहिजेत, असे मत असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पूनाचे अध्यक्ष प्रमोद भावसार यांनी नुकतेच व्यक्त केले.

नुतन कार्यकारणीचा रावेत येथे शनिवारी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी भावसार बोलत होते. व्यासपीठावर ऑल इंडिया मोटार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमृतलाल मदान, चेअरमन डॉ. जी. आर. शनमुगप्पा, कोअर कमिटी चेअरमन मलकिनसिंग बाल, उपाध्यक्ष अरविंद अप्पाजी, अर्थ विभाग चेअरमन डॉ. सुंदरराज पोन्नुस्वामी, काला ग्रुप ऑफ कंपनीजचे कार्यकारी संचालक मनोज फुटाणे, सुमित धुमाळ, अनुज जैन, प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, पोलीस निरिक्षक विश्वजीत खुळे आदी उपस्थित होते.

अमृतलाल मदान म्हणाले की, वाहतुक व्यावसायिकांमधील अनावश्यक स्पर्धा संपली पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन संघटीत होऊन वाहतूक व्यवसायिक, ट्रक चालक, मदतनीस यांना भेडसावणाऱ्या समस्या, ठीक ठिकाणी प्रशासनाकडून चेक पोस्टवर केली जाणारी पैसा वसुली बंद झाली पाहिजे. यासाठी एक कृती आराखडा तयार करून त्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सिमा निकम यांनी केले. जगराम चौधरी, अनिल शर्मा यांनी आभार मानले. यावेळी देशभरातून आलेले वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी, सभासद, बाजार समिती प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. बाबासाहेब धुमाळ यांनी केली संघटनेची बांधणी : मलकितसिंग बाल

पूर्वी वाहतूक व्यवसायिकांमध्ये एकी नव्हती. प्रत्येक जण आपल्यापरिने काम करत होता. अशा असंघटित वाहतूक व्यावसायिकांना एकत्र आणण्याचे काम स्व. बाबासाहेब धुमाळ यांनी केले, असे सांगून बाल यांनी धुमाळ यांच्या आठवणी जागवल्या. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यामध्ये वाहतूक व्यवसायाचा मोठा वाटा आहे. वाहने चालली तरच अर्थव्यवस्थेला गती मिळेल.

... तरच ‘सबका साथ, सबका विकास’ : डॉ. शनमुगप्पा

डॉ. शनमुगप्पा म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार 'सबका साथ, सबका विकास' हे ध्येय, उद्दिष्ट ठेवून काम करत असल्याने वारंवार सांगते. परंतु; वाहतुक उद्योगास आजही अनेक संकटे, अडचणींशी सामना करावा लागत आहे. महामार्गावर ट्रक ड्रायव्हर, मदतनीस यांच्यासाठी विश्रामगृहाची सोय नाही, जीएसटी आल्यानंतर काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंतचे जकातनाके, चेक पोस्ट बंद झाले. परंतु, आजही ट्रक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असताना त्यांची तपासणी केली जाते. वाहने अडवून प्रशासन आर्थिक लुबाडणूक करते. पोलिस आणि आरटीओचा त्रास सहन करावा लागतो. तसेच टोल बाबतही अनेक प्रश्‍न आहेत. कर्ज घेऊन वाहतूकदार व्यवसाय करतो. पण, सरकारकडून सन्मानाची वागणूक मिळत नाही.

असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पूना अध्यक्षपदी प्रमोद भावसार

पिंपरी : अखिल भारतीय मोटार काँग्रेसच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या ‘असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पूना’ या संस्थेची नुकतीच नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पूर्ण झाली.

नुतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे -

प्रमोद भावसार (अध्यक्ष), सुमित बाबासाहेब धुमाळ (उपाध्यक्ष), अनुज धरमवीर जैन (सचिव), सतनामसिंग पन्नू (खजिनदार), गौरव अशोक कदम (मुख्य समन्वयक), विनोद जगजमपि (उपाध्यक्ष व समन्वयक), अशोक भिकाजी काळे (कार्याध्यक्ष), दलबिर चौधरी (कार्याध्यक्ष), अनिलकुमार शर्मा (कार्याध्यक्ष), जिलेसिंग मान (सहसचिव), सदस्य म्हणून रोहतास चौधरी, श्याम अगरवाल, सुभाष शर्मा, पप्पू शर्मा, सुरेश कुमार नेहरा, राजकुमार फडतरे, प्रदीप नलवडे, मनीष चोप्रा, बाळकृष्ण उरे, रविन्द्र शर्मा, विजेंद्र चौधरी, तेजस डेरे, सुभाष धायल, सतीश पुनिया यांचा समावेश आहे. ही कार्यकारणी २०२२ ते २७ या पाच वर्षांसाठी निवडण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com