Pimpri Chinchwad politics : पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या सात स्वीकृत सदस्यांची निवड कशी होणार? विधानसभानिहाय सूत्राची चर्चा

BJP Discusses Names for Seven Nominated Members in Pimpri Chinchwad Municipal Corporation : पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या सात जागांसाठी भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. चिंचवड, भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघनिहाय जागावाटपाच्या सूत्रावर पक्षांतर्गत खलबते सुरू आहेत.
BJP Nominated Corporator Selection Pimpri Chinchwad

BJP Nominated Corporator Selection Pimpri Chinchwad

esakal

Updated on: 

पिंपरी : महापालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. मात्र, स्वीकृत नगरसेवकपदाच्या सात नावांचा मेळ अद्याप शहरातील कारभाऱ्यांना घालता आलेला नाही. इच्छुकांची वाढती संख्या, समर्थकांच्या शिफारशी आणि निष्ठावंतांनी उपस्थित केलेला अन्यायाचा मुद्दा, यामुळे नियुक्तीसाठी राजकारण तापले आहे.

Loading content, please wait...

Related Stories