esakal | 'स्मार्ट सिटीं'च्या रॅंकिंगमध्ये पिंपरी-चिंचवडने टाकले पुण्याला मागे

बोलून बातमी शोधा

'स्मार्ट सिटीं'च्या रॅंकिंगमध्ये पिंपरी-चिंचवडने टाकले पुण्याला मागे}
  • देशातील १११ स्मार्ट सिटींच्या रॅंकिंगमध्ये पिंपरी-चिंचवड चौथे
  • पुण्याचा पाचवा क्रमांक
  • राहण्यायोग्य शहर व महापालिका कामाचे मूल्यमापन
'स्मार्ट सिटीं'च्या रॅंकिंगमध्ये पिंपरी-चिंचवडने टाकले पुण्याला मागे
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : नागरिकांचे राहणीमान व महापालिकेचे कामकाज यातील दहा निकषांच्या आधारे केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने देशातील १११ शहरांचे रॅंकिंग गुरुवारी (ता. ४) जाहीर केले. त्यात महापालिकेच्या कामकाजाबाबत पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीने देशात चौथे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे यामध्ये पुणे शहराला एका क्रमांकाने पिंपरी-चिंचवडने मागे टाकले आहे. पुणे स्मार्ट सिटीचा पाचवा क्रमांक आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाच्या स्मार्ट सिटी योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाला. या योजनेसाठी पिंपळे सौदागर संपूर्ण आणि पिंपळे गुरव, पिंपळे निलख, वाकड व रहाटणी या गावांच्या काही भागचा समावेश करण्यात आला आहे. योजनेला पाचवे वर्ष सुरू आहे. देशातील १११ शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये सहभाग आहे. या शहरातील नागरिकांचे राहणीमान आणि महापालिकांचे कामकाज यातील दर्जाबाबत केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने देशातील स्मार्ट सिटींमध्ये स्पर्धा घेतली होती. गेल्या वर्षी एक फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत स्पर्धा झाली आहे. त्याच्या निकालाची घोषणा केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री हरदीप सिंह पुरी व केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मित्रा यांनी गुरुवारी (ता. ४) दुपारी साडेबारा वाजता केली. त्यात महापालिकेच्या कामकाजाबाबत पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीने देशातील १११ शहरांमध्ये चौथे स्थान पटकाविले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्मार्ट सिटीच्या रॅंकिंगमध्ये इंदूर शहराने (मध्य प्रदेश) प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे. द्वितीय क्रमांकावर सुरत (गुजरात), तृतीय क्रमांकावर भोपाल (मध्य प्रदेश), चतुर्थ क्रमांकावर पिंपरी-चिंचवड व पाचव्या स्थानावर पुणे शहर आहे.

शहरातील रस्ते, पदपथ, सायकल ट्रॅक सुविधा, कचरा संकलन व प्रक्रिया, जलनि:सारण,  पाणीपुरवठा, नागरिकांचा सहभाग, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आदी निकषांचे मूल्यमापन स्मार्ट सिटी रॅंकिंगसाठी करण्यात आले.

पिंपरी-चिंचवडची कोरोनातील कामगिरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'पीसीएमसी स्मार्ट सारथी' या 'मोबाईल अॅप'च्या माध्यमातून 'मेड ऑन गो स्मार्ट हेल्थ- टेलिमेडिसीन' सुविधेद्वारे कोरोना काळातही चांगली सेवा दिली आहे. 'मेड ऑन गो स्मार्ट हेल्थ- टेलिमेडिसीन' या सुविधेद्वारे नागरिकांना घरबसल्या योग्य मार्गदर्शन मिळत आहे. ही सुविधा नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोरोना साथीमुळे घराबाहेर पडता येत नाही, अशा परिस्थितीमध्ये घरातच राहून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळाल्यामुळे नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(संपादन- शिवनंदन बाविस्कर)