esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये १८४ नवीन रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients

पिंपरी-चिंचवडमध्ये १८४ नवीन रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी १८४ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७२ हजार ३३७ झाली आहे. आज २०४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ६६ हजार १०८ झाली आहे. सध्या एक हजार ४३१ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील चार हजार ४०८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत ५७८ रुग्ण उपचार घेत आहेत. ८५३ रुग्ण होम आयसोलेट आहेत.

आजपर्यंत १६ लाख ८ हजार ७९३ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या ५४ मेजर व ४२८ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ६२७ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. दोन हजार ४२३ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

loading image
go to top