esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये २०० नवीन रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona, covid 19

पिंपरी-चिंचवडमध्ये २०० नवीन रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी २०० रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ६९ हजार ९५८ झाली आहे. आज १३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ६४ हजार ३९० झाली आहे.

सध्या एक हजार ४२८ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील चार हजार ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत ६०९ रुग्ण उपचार घेत आहेत. ८१९ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत १४ लाख ८० हजार ६९ व्यक्तींना लस देण्यात आली आहे.

शहरात सध्या ४६ मेजर व ४१२ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ५१३ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. एक हजार ८६० जणांचे विलगीकरण करण्यात आले.

loading image
go to top