esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये १७६ नवीन रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

पिंपरी-चिंचवडमध्ये १७६ नवीन रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी १७६ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७० हजार ७८६ झाली आहे. आज २७३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ६५ हजार ४५३ झाली आहे.

सध्या एक हजार ३३८ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील चार हजार ४०५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत ६०३ रुग्ण उपचार घेत आहेत. ७३५ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत १५ लाख ५१ हजार ८२१ व्यक्तींना लस देण्यात आली आहे.

शहरात सध्या ५१ मेजर व ४१४ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ६११ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. दोन हजार ३३३ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

loading image
go to top