

Pimpri Chinchwad Water Supply: Seven Years of Alternate-Day Water Supply
esakal
पिंपरी : पाणी येण्याच्या दिवशी टाक्या, ड्रम भरून ठेवायचे... दुसऱ्या दिवसासाठी पाणी जपून वापरायचे... पुरेसा साठा झाला नाही, तर टँकर मागवायचा...पिंपरी चिंचवडकरांच्या या कसरतीला बुधवारी (ता. २५) सात वर्षे पूर्ण होत आहेत. पाणीपुरवठ्याच्या सुधारणांसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही ‘रोज पाणी मिळणार कधी?’ या प्रश्नाचे निश्चित उत्तर नागरिकांना मिळालेले नाही.