Pimpri chinchwad : पोटनिवडणुकांसाठी राष्ट्रवादीतर्फे २० स्टार प्रचारकांची तोफ धडाडणार

- शरद पवार, जयंत पाटील, अजित पवारांसह डॉ. अमोल कोल्हे, सुनिल शेळकेंचाही समावेश
Sharad pawar
Sharad pawarsakal

पिंपरी : चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने २० स्टार प्रचारकांची नावे प्रदेश समितीच्यावतीने जाहिर केली आहेत. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह स्थानिक नेत्यांचाही समावेश आहे.

चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघांसाठी येत्या दिनांक २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी माघार घेण्याची तारीख उद्या १० फेब्रुवारी रोजी आहे. भाजपच्यावतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निवडणुका बिनविरोध होण्याबाबत आवाहन केले होते.

परंतु; जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अजित पवार व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या निवडणुका लढविण्यासाठी आग्रही होते. त्यानुसार दोन्ही जागांवर दोन्ही पक्षांच्यावतीने अर्ज भरण्यात आल्याने या निवडणुकांवर शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान; राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश समितीच्यावतीने सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना २० स्टार प्रचारकांची यादी पाठवली आहे. केंद्र, राज्य, ग्रामीण आणि शहर पातळीवरील नेत्यांचा निवडणूक प्रचारात सहभाग करुन घेण्यात आला आहे.

स्टार प्रचारकांमध्ये शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार, भुजबळ, डॉ. कोल्हे यांचा समावेश

राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ,माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार फौजिया खान, माजी मंत्री जितेंद्र अव्हाड, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार वंदना चव्हाण, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी मंत्री शशीकांत शिंदे, आमदार सुनील शेळके, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, आमदार निलेश लंके, आमदार अमोल मिटकरी, सुभान अली शेख यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com