Water Shortage : पिंपरी चिंचवड शहराला पाणीटंचाईच्या फेब्रुवारीतच झळा; ‘टँकर लॉबी’चे राजकारण असल्याचा नागरिकांचा आरोप

PCMC water supply issue : उन्हाळ्याचा चटका बसू लागल्याबरोबर उपनगरातील काळेवाडी, थेरगाव, पिंपळे सौदागर, जुनी सांगवी, थेरगाव आदी भागांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या ‘झळा’ बसू लागल्या आहेत.
water shortage in pimpri chinchwad

water shortage in pimpri chinchwad

sakal

Updated on

पिंपरी - उन्हाळ्याचा चटका बसू लागल्याबरोबर उपनगरातील काळेवाडी, थेरगाव, पिंपळे सौदागर, जुनी सांगवी, थेरगाव आदी भागांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या ‘झळा’ बसू लागल्या आहेत. पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

रोजच्या वापरासाठी पाण्याचे खासगी टँकर मागवावे लागत आहेत, तर पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत आहे. या सर्व प्रकारांमागे आर्थिक आणि ‘टँकर लॉबी’चे राजकारण असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com