Coronavirus : आख्खं पिंपरी-चिंचवड आक्रमिले

पीतांबर लोहार
गुरुवार, 21 मे 2020

- फक्त शहराच्या मुख्य प्रवाहापासून काहीशी लांब असलेली तीन गावे त्याच्या विळख्यात अद्याप आलेली नाहीत.

पिंपरी : नमस्कार मंडळी, आज 70 दिवस झाले. आपण पिंपरी चिंचवडकर लढतोय. ज्या प्रमाणात रुग्ण वाढताहेत, त्या प्रमाणात कमी सुद्धा होताहेत. पण, 11 मार्च रोजी एकट्या पुनावळेत आढळलेला तो आज शहरभर पसरलाय. फक्त शहराच्या मुख्य प्रवाहापासून काहीशी लांब असलेली तीन गावे त्याच्या विळख्यात अद्याप आलेली नाहीत. ती म्हणजे बोपखेल, डुडुळगाव आणि मामुर्डी.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बाकी पूर्वेकडच्या चऱ्होलीपासून पश्चिमेकडील वाकडपर्यंत आणि उत्तरेच्या तळवडे रुपीनगरपासून दक्षिणेकडील दापोडी-सांगवीपर्यंत सर्वच गावांमध्ये तो पोचला आहे. आपल्याला माहितीच आहे की, पिंपरी चिंचवड शहराची निर्मिती ही अनेक गावांनी मिळून झालेली आहे. सुरवातीला म्हणजे 1972 मध्ये पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी व भोसरी अशा पाच गावांतील ग्रामपंचायती बरखास्त करून नगरपालिका स्थापन झाली. याच कालावधीत नियोजनबद्ध शहरं निर्मितीसाठी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अस्तित्वात आले. कालांतराने काही गावे समाविष्ट झाली आणि 1982 मध्ये महापालिका अस्तित्वात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही वर्षांनी आणखी गावे समाविष्ट केली आणि शहराचा विस्तार झाला आहे. थोडक्यात म्हणजे अनेक गावांचे मिळून शहराची निर्मिती झालेली आहे आणि याच गावांमध्ये आता कोरोना शिरलाय. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील डाॅक्टर, नर्स, सेवक, पोलिस, आरोग्य विभाग व महापालिकेच्या अन्य विभागातील अधिकारी कर्मचारीसुद्धा लढत आहेत. त्यांच्या लढ्याला यशही येत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कारण, संसर्ग झालेल्या 245 पैकी 142 जण बरे होऊन घरी गेले आहेत. हीच आपल्यासाठी जमेची बाजू आहे. त्यामुळे आपण कोरोनावर मात करतोय हे दिसतंय. पण, कोणत्या गावात किती जणांना संसर्ग झालेला आहे, हेही आपल्याला माहिती असायला हवे, हो ना!

गावानुसार रुग्ण
गाव/रुग्ण
ताथवडे/२
पुनावळे/५
किवळे/४
चिंचवडगाव/२
पिंपरीगाव/६
भोसरी/३३
मोशी/१५
च-होली/१३
दिघी/७
दापोडी/३
पिंपळे सौदागर/४
रहाटणी/५
वाकड/४
थेरगाव/९
खराळवाडी/१२
चिखली/४
ताम्हाणे वस्ती/३
आनंदनगर/३८
कासारवाडी/२
आकुर्डी/२
संभाजीनगर/६
मोहननगर/१
रुपीनगर/३९
तळवडे/५
नेहरूनगर/१
जुनी सांगवी/९
फुगेवाडी/१
पिंपळे गुरव/८
पिंपळे निलख/१

====================

गुरुवारी (ता. २१) सकाळी ८.३०पर्यंतची स्थिती
आजपर्यंत एकूण रुग्ण : 245
आज पाॅझिटीव्ह : 2
आजपर्यंत बरे झालेले : 142
सध्या उपचार घेणारे : 96
आजपर्यंत मृत्यू : 7.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pimpri Chinchwad Found various Corona Infected Patients