Garbage Processing Centre : पिंपरी चिंचवडमध्ये स्वच्छ सर्वेक्षणातील यशानंतरही कचऱ्याचा प्रश्न कायम; नगरसेवकांनी ठेकेदार आणि महापालिका प्रशासनाला धरले धारेवर

Pimpri Chinchwad Waste Management Issue Raised in Municipal General Body Meeting : स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात पहिला क्रमांक मिळाल्यानंतरही प्रभागांमधील कचऱ्याचा प्रश्न कायम असल्याने नगरसेवकांनी महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांना जाब विचारला. मोशी दुर्घटना, कचरा प्रक्रिया केंद्रे आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रश्नही सभेत उपस्थित झाले.
Pimpri Chinchwad Waste Management Issue Raised in Municipal General Body Meeting

Pimpri Chinchwad Waste Management Issue Raised in Municipal General Body Meeting

sakal
Updated on: 

पिंपरी : ‘स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात पहिला क्रमांक मिळाला; पण प्रभागांमधील कचऱ्याच्या समस्येचे काय?’ असा सवाल करत सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरले. स्वच्छतेतील यशाबद्दल अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतानाच मोशी दुर्घटनेनंतरचे कचरा व्यवस्थापन, प्रभागनिहाय प्रक्रिया केंद्रे, ठेकेदारांची मनमानी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

Loading content, please wait...