

Gas Cylinder Scam Exposed: Delivery Messages Received, but Cylinders Missing
Sakal
पिंपरी : ‘‘गॅस सिलिंडर बुकिंगचा मेसेज आला. दोन दिवसांनी सिलिंडर घरी पोचवल्याचाही मेसेज आला. मात्र, तो मिळालाच नाही. अधिक माहितीअंती कळले की, वितरकाने सिलिंडरवर डल्ला मारला,’’ असे अनुभव शहरातील गॅस ग्राहकांना येत आहेत. यामुळे सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचे स्पष्ट होते. मात्र अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग डोळ्यांवर पट्टी बांधून आहे. फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने त्यांना अभय कोणाचे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.