esakal | पिंपरी-चिंचवडला मिळाले २ टँकर ऑक्सिजन, पण तोही २ दिवस पुरेल एवढाच!

बोलून बातमी शोधा

oxygen

‘ऑक्सिजनचा उपलब्ध साठा पुरेसा नाही’ ; आमदार महेश लांडगे

पिंपरी-चिंचवडला मिळाले २ टँकर ऑक्सिजन, पण तोही २ दिवस पुरेल एवढाच!
sakal_logo
By
पिंताबर लोहार

हेही वाचा: प्लाझ्मा दान करताय? मनातील शंका दूर करा

शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. शासकीय रुग्णालयांसाठी आणलेला ऑक्सिजनचा एक टँकर सोमवारी (ता. १९) पिंपरी-चिंचवडला दिला नाही. त्यानंतर मंगळवारी पुन्हा प्रशासनाने ऐनवेळी ऑक्सिजन टँकर न देण्याचा निर्णय घेतला. याबाबत लोकप्रतिनिधींनी विनवणी करण्यासाठी संपर्क केला; पण प्रतिसाद मिळाला नाही. यावर आमदार लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

पिंपरी-चिंचवडला आरोग्य सुविधांबाबत दुजाभाव केला जात असेल, तर प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. शहरातील सुमारे ६०० रुग्णांना सध्या ऑक्सिजनची गरज आहे. असे असताना जिल्हा प्रशासन हलगर्जीपणा करीत आहे, अशी टीका लांडगे यांनी केली होती.

हेही वाचा: माजी खासदार संजय काकडेंना अटक; गजा मारणे प्रकरण भोवणार

‘ऑक्सिजनचा उपलब्ध साठा पुरेसा नाही’

पुणे जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेला ऑक्सिजन साठा दोन दिवस पुरेल इतकाच आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सर्वांची धावपळ सुरू आहे. शहरातील रुग्णांना आवश्यक ऑक्सिजन पुरवठा झाला नाही, तर मोठे संकट कोसळण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजन टँकरबाबत सकारात्मक भूमिकेतून पिंपरी-चिंचवडकरांच्या भावनांचा विचार करावा. तसेच, ऑक्सिजन उत्पादनाचे स्रोत निर्माण करावेत, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.