

Pimpri Chinchwad Hawkers Zone Planning
पिंपरी : ‘‘शहरातील पथविक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध हॉकर्स झोन निर्माण करण्याची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येईल. त्यासाठी सर्व प्रभागांमध्ये योग्य जागांची पाहणी करण्यात येणार आहे. पात्र विक्रेत्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याच्या प्रक्रियेलाही गती देण्यात येईल,’’ अशी माहिती महापालिका आयुक्त तथा पथविक्रेता समितीचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी दिली.