देशातील स्मार्ट सिटी रॅंकिंगमध्ये पिंपरी चिंचवड उद्योगनगरीला 41 वा क्रमांक

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 20 January 2021

देशातील स्मार्ट सिटी रॅंकिंगमध्ये पिंपरी चिंचवड उद्योगनगरीने 41 वा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये शहर देशात 69 व्या क्रमांकावर होते.

पिंपरी - देशातील स्मार्ट सिटी रॅंकिंगमध्ये पिंपरी चिंचवड उद्योगनगरीने 41 वा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये शहर देशात 69 व्या क्रमांकावर होते.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत शहराचा समावेश तिसऱ्या टप्प्यात झाला. प्रत्यक्ष कामांना मार्च 2018 मध्ये सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी संपूर्ण पिंपळे सौदागरसह पिंपळे निलख, पिंपळे गुरव व रहाटणी या गावांच्या काही भागाचा समावेश करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांनुसार केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयातर्फे दर तीन महिन्यांनी रॅंकिंग केले जात आहे. त्यासाठी वेगवेगळे निकष गृहीत धरण्यात येतात. यात स्मार्ट सिटी प्रकल्पावरील खर्च, कामांची प्रगती, कामांचे आदेश, प्राप्त निधीचा खर्च, निविदा प्रक्रिया, लोकांचा सहभाग आदी निकषांचा समावेश आहे.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एक हजार 155 कोटी रुपये खर्चाची विविध कामे सुरू आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad industrial city ranks 41st countrys smart city rankings