Pimpri-Chinchwad : कासाराची वाडी ते मल्टिट्रान्स्पोर्ट हब

कब्बडी क्षेत्रातही कासारवाडी आघाडीवर राहिली. कालांतराने बाजारपेठ आली. १९८२ मध्ये महापालिकेत समावेश झाला.
pimpri chichwad
pimpri chichwad sakal

ओळख उपनगरांची...

मुंबई-पुणे महामार्गावरील कासारवाडीतील शेतकऱ्यांच्या बहुतांश जमिनी लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अर्थात ‘सीएमई’साठी गेल्या. काही शेतकरी कुडाची घरे बांधून शेतात राहू लागली होती. मोजकीच दहा ते बारा घरे होती.

त्यांच्याकडे गायी, म्हशी होत्या. दूध विकून गुजराण सुरू होती. लांडगे, लांडे, जवळकर, रानवडे अशी येथील घराणे. १९६२-६३ मध्ये या परिसरात कारखाने आले. कामगारांची भरती होऊ लागली. त्यांना राहण्यासाठी शेतकऱ्यांनी चाळी बांधल्या.

हळूहळू कुस्तीची तालीम उभी राहिली. अनेक पहेलवान नावारूपाला आले. वारकरी वारसाही जोपासला गेला. कालांतराने वाडी कुस्ती अन् कब्बडीचे माहेर घर बनली. कब्बडी क्षेत्रातही कासारवाडी आघाडीवर राहिली. कालांतराने बाजारपेठ आली. १९८२ मध्ये महापालिकेत समावेश झाला.

विकासाला गती मिळाली. शाळेची इमारत उभी राहिली. महापालिकेचा दवाखाना सुरू झाला. पोस्ट ऑफिस आले. आता ट्रान्सपोर्टनगरी ते कार एक्सेसिरीजचा हब, अशीही ओळख मिळाली आहे.

pimpri chichwad
Pune News : प्लॉट, प्लिंथ सोसायट्यांचा पुनर्विकास शक्य

एका वाडीत झाडाखाली बांगड्या भरणारा कासार बसायचा. त्यांच्याकडे वाडीतील महिला बांगड्या भरण्यासाठी यायच्या. त्यामुळे वाडीला नाव पडले कासारवाडी. येथील शेतकऱ्यांचा उत्पन्नांचा स्रोत दुग्ध व्यवसाय, नंतर परिसरात कंपन्या आल्या आणि कामगारांसाठी शेतात ‘चाळी’ बांधल्या गेल्या.

वारकरी संप्रदाय जोपासला. ‘पहेलवानकीचा वारसा’ मिळाला. आता कासारवाडी उद्योगनगरीचे उपनगर झाले आहे. मल्टिट्रान्स्पोर्ट हब झाले आहे. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, बीआरडी आली आहे. जेआरडी टाटा उड्डाणपुलामुळे वैभवात भर पडली आहे. दळणवळणासाठी मध्यवर्ती ठिकाण झाले आहे. विकासाकडे जाताना गावपण जपले आहे...

विजय गायकवाड

pimpri chichwad
Nana Patole : आम्हाला सत्ता द्या, आरक्षण लगेच देऊ; नाना पटोले यांचा दावा, पत्रकार परिषदेत सरकारवर टीका

ओळख...

मंदिरे : दत्त मंदिर, शितळादेवी, हनुमान मंदिर, शंकर मंदिर, पांडुरंग मंदिर, मांगीर बाबा मंदिर

उत्सव : भैरवनाथ यात्रा चैत्र महिन्यात असते, पालखी मिरवणूक निघून ग्रामप्रदक्षिणा असते

उद्याने : सीतांगण, मामासाहेब पिंपळे, चड्डा उद्यान

दृष्टिक्षेप

महामार्ग, लोहमार्ग, नदी ओलांडून जाणारा दुमजली उड्डाणपूल

आंतरराष्ट्रीय बोटिंग प्रशिक्षणासह स्पर्धेचे सर्वांत मोठे केंद्र

श्री छत्रपती शाहू महाराज इंग्रजी माध्यमाची शाळा विनामूल्य

कचरा, पाणी, प्रदूषण विषयांवरील जर्मनीतील अभ्यास दौऱ्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची निवड

pimpri chichwad
Satara Dahihandi : निवडणुकीच्या तोंडावर साताऱ्यात दहा लाखांच्या दहीहंड्या; दोन्ही राजेंच्या समर्थकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

औद्योगिक क्षेत्रामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. चाळींचे रूपांतर इमारतींमध्ये होत आहे. कासारवाडीला दोन मेट्रो स्टेशन (कासारवाडी व नाशिक फाटा) व एक रेल्वे स्टेशन मिळाले आहे. यामुळे कासारवाडी मध्यवर्ती ठिकाण झाले आहे. ट्रान्सपोर्टच्या दृष्टीने देशातील मध्यवर्ती जंक्शन होईल, असे वाटते.

- रमेश लांडगे, रहिवासी, कासारवाडी

कासारवाडीने उद्योगपती घडविले आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत सोईचे अन् मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे अनेक उद्योगपती आणि कामगारांचा कल कासारवाडीकडेच होता. याच वाडीत टोलेजंग इमारती, आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित डिजिटल शाळा, मोठमोठ्या कंपन्या या भागात असल्याचे समाधान वाटते.

- राजेंद्र शेळके, उद्योजक, कासारवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com