Pimpri Chinchwad : बेपत्ता मुलीला प्रेमाचा ‘किनारा’; उत्तर प्रदेशातील मायलेकींची वृद्धाश्रम आणि ‘सकाळ’मुळे हृद्य भेट

तातडीने त्या जिजामाता चौकात दाखल झाल्या.
Pimpri Chinchwad
Pimpri ChinchwadSakal

तळेगाव स्टेशन - उत्तर प्रदेशमधील देवरिया येथून अचानक बेपत्ता झालेल्या मुलीची अडीच महिन्यांनी आपल्या आईशी भेट झाली.

आपल्या बेपत्ता झालेल्या मुलीला मावळ तालुक्यातील अहिरवाडे येथील किनारा वृद्धाश्रमात सुरक्षित असलेली पाहून तब्बल सतराशे किलोमीटरहून आलेल्या मातेने आनंदाश्रूंना मोकळी वाट करून दिली. किनारा वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रीती वैद्य आणि सहकाऱ्यांनी मायलेकींची ही भेट घडवून आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

Pimpri Chinchwad
Pune Crime : 'झूमकार' ॲपवरुन कार भाड्याने घेतली पण परत दिलीच नाही; शोध लागला थेट गुजरातमध्ये...

तळेगाव दाभाडे येथील माजी नगरसेवक अरुण माने यांना तीन जुलैला जिजामाता चौकातील त्यांच्या दुकानाशेजारी एक महिला विपन्नावस्थेत निपचित पडलेली दिसली.

त्यांनी ही गोष्ट ‘सकाळ’चे प्रतिनिधी गणेश बोरुडे यांच्याकरवी अहिरवाडे येथील किनारा वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रीती वैद्य यांना कळवली. तातडीने त्या जिजामाता चौकात दाखल झाल्या. महिलेला अशक्तपणामुळे नीट उभेही राहता येत नव्हते.

Pimpri Chinchwad
Pune Rain News : पुणे जिल्ह्यात २५९ मिलिमीटरची पावसाची नोंद

मानसिकदृष्ट्या ती अस्थिर असल्याचे जाणवले. डोक्याला जखमा असल्याने तिला रुग्णवाहिकेतून ससूनमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. तिथे आठवडाभर उपचार घेतल्यानंतर तिला ९ जुलैला किनारा वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले.

प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाल्याचे लक्षात आल्यानंतर किनारा वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रीती वैद्य यांनी त्या महिलेकडून घरचा पत्ता आणि नातेवाइकांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

बेपत्ता मुलीला प्रेमाचा ‘किनारा’ तिने सांगितलेल्या तुटपुंज्या माहितीनुसार वैद्य यांनी इंटरनेटच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमधील देवरिया पोलिसांशी संपर्क साधत या महिलेबाबत कळवले. तिकडे राणी खातून ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होती.

Pimpri Chinchwad
Mumbai Nashik Highway : मुंबई-नाशिक महामार्ग होणार चकाचक ; वाडा-भिवंडी रस्ताही होणार खड्डेमुक्त

त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क करून दिल्यानंतर तिच्या आईचा जीव भांड्यात पडला. उत्तर प्रदेशमधील देवरिया येथून तिची आई मुबारक अन्सारी १६ जुलैला सकाळी किनारा वृद्धाश्रमात पोहोचली.

अचानक समोर आलेल्या मायलेकींनी एकमेकींना पाहताच प्रेमाने कवटाळत आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.

Pimpri Chinchwad
Pune News : वाढदिवसाचे औक्षण झाल्यानंतर बजावले कर्तव्य!

या प्रसंगाने किनारा वृद्धाश्रमाची टीमही गहिवरली. या महिलेचा पतीही मनोरुग्ण असून, तिला तीन मुले असल्याचे तिच्या आईने सांगितले.

खर्चाला काही रक्कम देत पोलिसांच्या मदतीने दोघींना रेल्वेगाडीत बसवून देण्यात आले. किनारा वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक गिरीश कुलकर्णी, सहकारी रविता कांबळे, शुभम खांडरे यांनी याकामी विशेष प्रयत्न केले. दोन- तीन दिवसांनी मायलेकी आपल्या गावी सुरक्षित पोचल्याचा निरोप भ्रमणध्वनीवरुन मिळाल्यानंतर किनारा वृद्धाश्रमाच्या टीमला आपल्या प्रयत्नांचे सार्थक झाल्याचे वाटले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com