सायबर गुन्ह्यांकडे अधिक लक्ष - पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vinay kumar chaubey

पिंपरी शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखणे ही प्राथमिकता आहे. दरम्यान, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठे आहे.

Vinay Kumar Chaubey : सायबर गुन्ह्यांकडे अधिक लक्ष - पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे

पिंपरी - शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखणे ही प्राथमिकता आहे. दरम्यान, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठे आहे. हे गुन्हे रोखण्यासह त्याच्या तपासावर अधिक लक्ष देणार असल्याचे पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी स्पष्ट केले.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी बुधवारी (ता.१४) मावळते पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून पदभार स्वीकारला त्यावेळी ते बोलत होते. मंगळवारी भारतीय पोलिस सेवेतील राज्यातील तीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यामध्ये अंकुश शिंदे यांची नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी बदली झाली. तर त्यांच्या जागी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस महासंचालक विनय कुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चौबे म्हणाले, 'सायबर गुन्हे वाढत असून त्यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. ज्यांना यामधील ज्ञान आहे, त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. गतीने तपास केला जाईल. तसेच स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्याची मागणी केली आहे. त्याचाही पाठपुरावा करणार आहे. सायबर विभाग अधिक सक्षम करण्यावर भर राहणार आहे.

तसेच आगामी निवडणुका शांततेत पार पडाव्यात तसेच कायदा सुव्यवस्था कायम राहील या दृष्टीने नियोजन केले जाईल.

पुरेसे मनुष्यबळ यासह इतर सुविधा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. पुरेसे मनुष्यबळ मिळाल्यास अधिक चांगले काम करणे शक्य होईल'.