पिंपरी-चिंचवड : मुळा पवनाच्या पाण्यात वाढ

पिंपरी-चिंचवड शहरासह विविध भागात सुरू असलेल्या पावसामुळे जुनी सांगवीच्या दोन्ही बाजुला असलेल्या मुळा व पवना नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
mula and pawana river water
mula and pawana river watersakal
Summary

पिंपरी-चिंचवड शहरासह विविध भागात सुरू असलेल्या पावसामुळे जुनी सांगवीच्या दोन्ही बाजुला असलेल्या मुळा व पवना नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

जुनी सांगवी - पिंपरी-चिंचवड शहरासह विविध भागात सुरू असलेल्या पावसामुळे जुनी सांगवीच्या दोन्ही बाजुला असलेल्या मुळा व पवना नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सांगवीतील नदीकाठावरील अहिल्यादेवी होळकर दशक्रिया विधी घाट पाण्याखाली गेला आहे. जुनी सांगवीत पवना व मुळशी धरणांमधून पाण्याचा विसर्ग केल्यास सांगवी करांना पुराच्या पाण्यामुळे जलकोंडींचा सामना करावा लागतो.

मुसळधार पावसामुळे फुगेवाडी येथील स्मशानभूमी व तेथील शौचालय कीर्तनकार यांची बैठक व्यवस्था असलेले आसन पाण्याखाली गेले आहे. सांगवी येथील अहिल्याबाई होळकर दशक्रिया विधी घाट पाण्याखाली गेला आहे. पिंपळे गुरव येथील गणपती विसर्जन घाटावरील हौद पाण्याखाली गेला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात सांगवी करांना पाण्याची धास्ती सतावत असते. येथील मुळा नदिकिनारा भागातील मधुबन,मुळा नगर झोपडी वसाहत,संगम नगर, प्रियदर्शनी नगर, दापोडी येथील सिद्धार्थ नगर,गुलाब नगर,काटे चाळ आदी नदी किनारा भागातील रहिवाशांना नदीच्या पुराच्या पाण्यामुळे नुकसान सहन करावे लागते. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परिस्थितीवर लक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोट- अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरासह दापोडी सांगवी, फुगेवाडी, कासारवाडी भागात प्रत्यक्ष पाहणी व खबरदारीच्या सुचना व उपाय योजना करण्यात येत असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे ओमप्रकाश बहिवाल यांनी सांगितले.या पथकात सहायक आरोग्य अधिकारी महेश आढाव, क्षेत्रीय अधिकारी विजय थोरात,आरोग्य निरीक्षक उमेश जाधव,पो.नि.बाळासाहेब आढारी,आकाश मडके,अनिल राऊत आदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com