esakal | कोरोनाप्रतिबंधक लस घ्या; पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचे आवाहन

बोलून बातमी शोधा

कोरोनाप्रतिबंधक लस घ्या; पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचे आवाहन}

सरकारच्या नियमानुसार, साठ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना व ४५ वर्षांवरील विविध आजारांनी त्रस्त नागरिकांना एक फेब्रुवारीपासून कोरोनाप्रतिबंधक लस दिली जात आहे.

कोरोनाप्रतिबंधक लस घ्या; पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचे आवाहन
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिपरी : केंद्र व राज्य सरकारच्या सूचनांनुसार शहरातील ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाप्रतिबंधक लस देण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. या लसीकरणांतर्गत विविध आजारांनी त्रस्त ४५ ते ६० वयोगटातील विहित वैद्यकीय प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तींनाही लस दिली जाणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारच्या नियमानुसार, साठ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना व ४५ वर्षांवरील विविध आजारांनी त्रस्त नागरिकांना एक फेब्रुवारीपासून कोरोनाप्रतिबंधक लस दिली जात आहे. महापालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय चिंचवड, पिंपळे निलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, यमुनानगर रुग्णालय आणि ईएसआय हॉस्पिटल मोहननगर चिंचवड स्टेशन यांचा समावेश आहे. या आठ ठिकाणी कोरोनाप्रतिबंधक लस मोफत दिली जात आहे. तसेच, शहरातील इतर १२ खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येईल. सांगवीतील जिल्हा सामान्य रुग्णालयातही लसीकरणाची सोय आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ह्रदयविकार, मधुमेह, रक्तदाब, स्ट्रोक, मुत्रपिंडाशी (किडनी), यकृत, श्‍वसन, कर्करोग, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले (एचआयव्ही), रक्तदोष आदी अतिजोखमीचे आजार असलेले व त्याच्याशी निगडित इतर आजार असणारे रुग्ण, डायलेसिसवरील रुग्ण इत्यादी आजार व उपचारी सुरू असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही लस देण्यात येणार आहे. परंतु, अशा रुग्णांना आजाराबाबत उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. 

लसीकरण नोंदणीसाठी हेल्पलाइन 
लसीकरण नोंदणी करण्यासाठी https://selfregistration.cowin.gov.in/ या लिंकचा वापर करावा. लसीकरणाच्या ठिकाणी कोणीही पूर्व नोंदणी शिवाय अनावश्यक गर्दी करू नये. तसेच, त्या ठिकाणी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.