असे असणार पिंपरी-चिंचवडचे नवे प्रभाग

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला; नगरपालिकेत असणाऱ्या ४६ प्रभागातील अशी असणार आहे प्रभाग रचना
Pimpri Chinchwad Ward Structure
Pimpri Chinchwad Ward StructureSakal
Summary

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला; नगरपालिकेत असणाऱ्या ४६ प्रभागातील अशी असणार आहे प्रभाग रचना

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला; नगरपालिकेत असणाऱ्या ४६ प्रभागातील अशी असणार आहे प्रभाग रचना

प्रभाग क्र. : १ तळवडे-त्रिवेणीनगर

व्याप्ती - गावठाण, आयटी पार्क, ज्योतिबानगर, सहयोगनगर, रुपीनगर, त्रिवेणीनगर

चतु-सीमा : उत्तर - इंद्रायणी नदी.

पूर्व - तळवडे-चिखली शीवरस्त्याने देहू-आळंदी रस्ता ओलांडून भारत वे ब्रीज सोनवणेवस्ती रस्त्याने सहयोगनगर रस्त्यापर्यंत

दक्षिण - क्रांतिसिंह रस्त्याने निगडी-तळवडे हद्दीपर्यंत स्वामी विवेकानंद शाळा व सोमेश्वर मंदिरापासून देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीपर्यंत

पश्चिम - महापालिका व देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्द

(लोकसंख्या - ४०,७६७)

प्रभाग क्र. : २ चिखली-कुदळवाडी

व्याप्ती - गावठाण, पाटीलनगर, गणेशनगर, मोरेवस्ती, सोनवणेवस्ती, कुदळवाडी

चतु-सीमा : उत्तर - इंद्रायणी नदी.

पूर्व - इंद्रायणी नदीपासून स्वस्तिक स्पृहा रस्त्यापासून ए. एस. चौधरी इमारत, विसावा चौकापासून वाघू सानेचौकपर्यंत

दक्षिण - वाघू साने चौक रस्त्याने अष्टिविनायक चौकातून तुळजाई हॉटेल, ताम्हाणे चौकापर्यंत

पश्चिम - ताम्हाणे तौकापासून धनगर बाबा मंदिर रस्त्याने सोनवणे वस्ती तळवडे-चिखली शिव रस्त्याने इंद्रायणी नदीपर्यंत

(लोकसंख्या - ३३,६५३)

प्रभाग क्र. : ३ बोऱ्हाडेवाडी-जाधववाडी

व्याप्ती - बोऱ्हाडेवाडी, रिव्हर रेसिडेन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज रेसिडेन्सी, वुडस् व्हिला, जाधववाडी

चतु-सीमा : उत्तर - इंद्रायणी नदी

पूर्व - इंद्रायणी नदीपासून पुणे-नाशिक रस्त्याने कृषी उत्पन्न बाजार समितीपासून गायत्री स्कूल रस्त्यापर्यंत

दक्षिण - गायत्री स्कूल रस्त्याने बनकर रस्त्यापर्यंत एमएनजीएल चौकापासून चंद्रभागा लॉन रस्त्याने संभाजी मार्गापर्यंत

पश्चिम - संभाजी मार्गापासून ग्रीन ऑटोमेशनपर्यंत सावता माळी रस्त्याने विसावा चौकातून स्वस्तिक स्पृहा रस्त्याने इंद्रायणी नदीपर्यंत

(लोकसंख्या - ३७,६७१)

प्रभाग क्र. : ४ मोशी

व्याप्ती - गावठाण, गंधर्वनगरी, आदर्शनगर, डुडुळगाव, नागेश्वरनगर, सद्‌गुरुनगर

चतु-सीमा : उत्तर - इंद्रायणी नदी

पूर्व - तापकीरनगरपासून ज्ञानविलास कॉलेज, काटे कॉलनीपासून दिघी मॅगझीन मंजुळा कॉलनी व चक्रपाणी वसाहत रस्ताने महादेव मंदिरापर्यंत

दक्षिण - महादेव मंदिरापासून अंबिका सुपर मार्केट व भगवती ग्लास रस्त्याने स्वराज मॉल व रोशन गार्डनपर्यंत.

पश्चिम - स्वराज मॉल, रोशन गार्डन समोरील पुणे-नाशिक महामार्गाने इंद्रायणी नदीपर्यंत

(लोकसंख्या - ३९,६४६)

प्रभाग क्र. : ५ चऱ्होली

व्याप्ती - चऱ्होली, चोविसावाडी, वडमुखवाडी, काळजेवस्ती, पठारेमळा, बुर्डेवस्ती, ताजणेमळा

चतु-सीमा : उत्तर - इंद्रायणी नदी

पूर्व - महापालिका हद्द

दक्षिण - फुले रस्त्यापासून माऊली लॉन्सपर्यंत भोसरी-आळंदी रस्त्याने समता विद्यालय रस्त्यापर्यंत

पश्चिम - समता विद्यालय रस्त्यापासून आकाश कॉलनी, अलंकापुरम रस्‍त्याने साईराज मंगल कार्यालयापासून इंद्रायणी नदीपर्यंत

(लोकसंख्या - ३९,९७०)

प्रभाग क्र. : ६ दिघी-बोपखेल

व्याप्ती - दिघी, समर्थनगर, गणेशनगर, बोपखेल गावठाण

चतु-सीमा : उत्तर - फुले रस्ता सत्यम मार्केटपासून पाण्याच्या टाकीपर्यंत, महापालिका व सीएमई हद्द

पूर्व - मिलिटरी, सीएमई, मनपा हद्द, बोपखेल व कळसमधील पुणे महापालिका हद्दीपर्यंत

दक्षिण - मिलिटरी, सीएमई हद्द व मुळा नदी

पश्चिम - महापालिका व सीएमई हद्द

(लोकसंख्या - ४०,६४६)

प्रभाग क्र. : ७ सॅण्डविक कॉलनी

व्याप्ती - सॅण्डविक कॉलनी, रामनगर, तुकारामनगर

चतु-सीमा : उत्तर - संत ज्ञानेश्वर विद्यालय दुर्गामाता रत्याने भाग्यलक्ष्मी सुपर मार्केट, आळंदी रस्त्यापर्यंत व माउली लॉन्सपर्यंत

पूर्व - माउली लॉन्सपासून भोसरी-दिघी शिव रस्त्याने विकास कॉलनी सीएमई मनपा हद्दीपर्यंत

दक्षिण - महापालिका हद्द

पश्चिम - फुगे विरंगुळा केंद्र, सॅण्डविक कॉलनी रस्त्याने प्रियदर्शनी शाळा रस्त्याने दुर्गामाता मंदिरापर्यंत

(लोकसंख्या - ३७,०९७)

प्रभाग क्र. : ८ भोसरी गावठाण

व्याप्ती - गावठाण, गवळीनगर, खंडोबामाळ, शीतलबाग

चतु-सीमा : उत्तर - फुले चौकापासून लांडगे लिंबची तालीमपासून पीएमटी चौकापर्यंत व तेथून पुढे पुरुषोत्तम क्लिनिकपर्यंत

पूर्व - पुरुषोत्तम क्लिनिक रस्त्यापासून ज्ञानेश्वर विद्यालय रस्त्याने सॅण्डविक कॉलनी रस्ता ओलांडून महापालिका हद्दीपर्यंत

दक्षिण - महापालिका हद्द

पश्चिम - महापालिका हद्दीपासून नाशिक महामार्गापर्यंत, टेल्को रस्त्याने आदित्यनगर, रामनगर, लांडेवाडी रस्त्याने फुले चौकापर्यंत

(लोकसंख्या - ३९,२१९)

प्रभाग क्र. : ९ धावडे वस्ती, भोसरी

व्याप्ती - धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहत

चतु-सीमा : उत्तर - नाथ फ्लोअर मिलपासून शीतल मार्केटपर्यंत, लॉ कॉलेज रस्त्याने नाल्यापर्यंत. दक्षिण मुखी हनुमान मंदिर आकाश कॉलनीपर्यंत

पूर्व - समता विद्यालय रस्त्याने गणेश कमान, राम मंदिर नंदनवन चौक, नाशिक महामार्गापर्यंत.

दक्षिण - पीएमटी चौकातून मनपा हायस्कूल रस्त्याने लिंबाची तालीम रस्त्याने फुले चौकापर्यंत

पश्चिम - फुले चौकापासून कुस्ती स्टेडियमलगत नाल्यालगत धावडे वस्ती, भगत वस्ती, नाथ प्लोअर मिलपर्यंत

(लोकसंख्या - ४०,०१८)

प्रभाग क्र. : १० इंद्रायणीनगर-लांडेवाडी

व्याप्ती - इंद्रायणीनगर, लांडेवाडी, महाराष्‍ट्र कॉलनी, शांतिनगर, गव्हाणे वस्ती

चतु-सीमा : उत्तर - इंद्रायणीनगर चौकातून स्वामी समर्थ बस स्टॉपच्या उत्तरेस पोस्ट ऑफिस रस्त्याने नाशिक रस्त्यापर्यंत

पूर्व - भोसरी बस डेपो, संकल्प सोसायटी, लॉ कॉलेज रस्त्यापर्यंत. आदिनाथनगर रस्त्याने नाशिक रस्त्यापर्यंत

दक्षिण - सीएमई, नाशिक रस्ता, महापालिका हद्द

पश्चिम - भोसरी कमान, जिजाऊ कॉलेजपर्यंत. टेल्को रस्त्याने कल्याणी सेल्स रस्त्यापर्यंत, इंद्रायणीनगर चौकापर्यंत

(लोकसंख्या - ३९,८०२)

प्रभाग क्र. : ११ गवळीमाथा- बालाजीनगर

व्याप्ती - गवळीमाथा, बालाजीनगर

चतु-सीमा : उत्तर - सावता माळी मंदिर रस्त्याने सेंक्टर ८ मधून आरटीओ लिंक रस्त्यापर्यंत, गायत्री स्कूलपासून नाशिक महामार्गापर्यंत

पूर्व - गायत्री स्कूलपासून नाशिक महामार्गाने सेक्टर ७ च्या गणेश मंदिरापर्यंत, इंद्रायणीनगर रस्ता, लांडेवाडी चौकापर्यंत

दक्षिण - लांडेवाडी चौकापासून फिलिप्स कंपनीपर्यंत सीआयईआयटी रस्त्याने पवना इंडस्ट्रिपर्यंत

पश्चिम - पवना इंडस्‍ट्रीपासून डीवाय कॉलेजलगत, पीएमपी डेपोपासून हॉकी स्टेडियमपर्यंत सावता माळी मंदिर रस्ता भाजी मार्केटपर्यंत

(लोकसंख्या - ३७,३६०)

प्रभाग क्र. : १२ घरकुल-नेवाळेवस्ती

व्याप्ती - घरकुल, नेवाळेवस्ती, हरगुडेवस्ती

चतु-सीमा : उत्तर - सुयश क्लिनिक रस्त्याने साने चौक आकुर्डी रस्त्यापर्यंत, मनपा शाळा ८९ कुदळवाडी रस्त्याने संभाजी मार्गापर्यंत

पूर्व - छत्रपती संभाजी रस्त्याने जिजामाता पार्कपर्यंत स्पाइन रस्त्याने जाधव सरकार चौकापर्यंत

दक्षिण - स्पाइन रस्ता

पश्चिम - आनंदघन वृद्धाश्रम, कुदळवाडी रस्त्यापासून शिवरकर रस्त्‍याच्या सुयश क्लिनिकपर्यंत

(लोकसंख्या - ३४,४१८)

प्रभाग क्र. : १३ मोरेवस्ती

व्याप्ती - मोरे वस्ती, म्हेत्रे वस्ती

चतु-सीमा : उत्तर - तळवडे-चिखली शिव रस्त्याने तुळजाई हॉटेलपासून मोरे स्कूल रस्त्याने गणेश इंटरनॅशनल स्कूल आकुर्डी रस्त्यापर्यंत

पूर्व - चिखली-आकुर्डी रस्त्याने साने चौकापर्यंत

दक्षिण - साने चौकापासून शिवरकर रस्त्याने अंगणवाडी चौक, म्हेत्रेवाडी उद्यान रस्त्याने शिवरकर चौकापर्यंत

पश्चिम - गणेश मंदिर रस्त्याने त्रिवेणीनगर रस्ता, तुळजाभवानी चौक, तळवडे-चिखली शिव रस्ता

(लोकसंख्या - ३९,१४९)

प्रभाग क्र. : १४ यमुनानगर-निगडी

व्याप्ती - यमुनानगर, फुलेनगर

चतु-सीमा : उत्तर - तळवडे रस्त्याने प्रजनन प्रबोधन शाळेपर्यंत

पूर्व - धनगर बाबा रस्त्याने आनंदघन आश्रमापर्यंत, कस्तुरी मार्केट बस स्टॉप व वरद हॉस्‍पिटलपर्यंत

दक्षिण - टीसीआय रस्त्याने टेल्को रस्त्यापर्यंत, दुर्गा चौकातून एलआयसी कॉर्नरपर्यंत

पश्चिम - व्यंकटेश सोसायटी रस्त्याने मॉर्डन कॉलेज रस्त्यापर्यंत, विवेकानंद शाळा ते त्रिवेणीनगर रस्त्यापर्यंत

(लोकसंख्या - ३५,७११)

प्रभाग क्र. : १५ संभाजीनगर-शाहूनगर

व्याप्ती - संभाजीनगर, बर्डव्हॅली, वृंदावन सोसायटी, पूर्णानगर, शाहूनगर, आरटीओ

चतु-सीमा : उत्तर - स्पाइन रस्ता

पूर्व - कुदळवाडी, चिखली रस्त्याने केएसबी चौकापर्यंत

दक्षिण - केएसबी चौकातून बर्ड व्हॅलीलगत टेल्को रस्त्याने थरमॅक्स चौकापर्यंत

पश्चिम - थरमॅक्स चौकातून चिखली-आकुर्डी रस्त्याने ओम साई स्पाईन रस्त्यापर्यंत

(लोकसंख्या - ३५,२०९)

प्रभाग क्र. : १६ नेहरूनगर

व्याप्ती - नेहरूनगर, अंतरीक्ष सोसायटी, विठ्ठलनगर, मगर स्टेडियम, टाटा मोटर्स, अमृतेश्वर सोसायटी, यशवंतनगर

चतु-सीमा : उत्तर - स्पाइन रस्ता

पूर्व - मर्सिडिझ बेंझ क्रांती चौकातून टेल्को रस्त्याने गुलाब पुष्प उद्यानापर्यंत. तेथून पीएमपी डेपोपर्यंत

दक्षिण - रोहन हाईट मुकेशनगर रस्त्यापर्यंत, संतोषी माता चौक, झिरो बॉईज चौक, रसरंगचौक, अमृतेश्वर कॉलनीपर्यंत मोरवाडी रस्त्यापर्यंत

पश्चिम - मोरवाडी रस्ता, अमृतेश्वर पासून आयुक्त बंगला, केएसबी चौकापर्यंत, स्पाइन पूल, रोटरी कुदळवाडीपर्यंत

(लोकसंख्या - ३५,४२४)

प्रभाग क्र. : १७ संत तुकारामनगर-वल्लभनगर

व्याप्ती - वल्लभनगर, एचए कॉलनी, वायसीएम, संत तुकारामनगर, महेशनगर, महात्मा फुलेनगर

चतु-सीमा : उत्तर - गांधीनगरपासून संतोषी माता चौकापर्यंत

पूर्व - संतोषी माता चौकापासून डीवाय कॉलेज, महात्मा फुलेनगर, फिलिप्स कंपनी कॉर्नर रस्त्यापर्यंत

दक्षिण - स्वरगंगा सोसायटी ॲंथोनी उद्यान, संत तुकाराम मंदिर गाडगे महाराज रस्ता मुंबई महामार्गापर्यंत

पश्चिम - इंडियन ऑइल पंपापासून खराळवाडी रस्ता राज हॉटेल, उर्दू शाळा, गांधीनगर, महिंद्रा कॉर्नर, नेहरूनगर रस्ता

(लोकसंख्या - ३४,१५०)

प्रभाग क्र. : १८ मोरवाडी, खराळवाडी

व्याप्ती - महापालिका भवन, मोरवाडी, ज्ञानेश्वरनगर, एम्पायर इस्टेट, अजमेरा कॉलनी, विशाल थिएटर, गांधीनगर, खराळवाडी

चतु-सीमा : उत्तर - लोहमार्गापासून एम्पायर इस्टेट, ऑटो क्लस्टर, आबीएमआर कॉलेज, मोरवाडी रस्त्यापर्यंत, अमृतेश्वर कॉलनी, अंतरिक्ष रस्त्यापर्यंत

पूर्व - अंतरिक्ष रस्त्याने रसरंग चौकापर्यंत, वास्तु उद्योग रस्त्याने झिरो बॉइज चौक रस्त्याने संतोषी माता चौकापर्यंत

दक्षिण - संतोषी माता चौकातून महिंद्रा कॉर्नर, गांधीनगर रस्त्याने बकाउल्फ, खराळवाडी उर्दू शाळा, पोस्ट ऑफिसपासून लोहमार्गापर्यंत

पश्चिम - लोहमार्ग

(लोकसंख्या - ३८,२४४)

प्रभाग क्र. : १९ चिंचवड स्टेशन

व्याप्ती - चिंचवड स्टेशन, दत्तनगर, मोहननगर, इंदिरानगर, आनंदनगर, एमआयडीसी कार्यालय

चतु-सीमा : उत्तर - मुंबई महामार्ग मेहता हॉस्पिटलपासून केंब्रिज स्कूलपर्यंत, धर्मवीर संभाजीनगर र्साता, मोहननगर शाळा, केएसबी चौकापर्यंत

पूर्व - केएसबी चौकातून मोरवाडी रस्त्याने न्यायालयापर्यंत

दक्षिण - न्यायालयापासून आयबीएमआर कॉलेज ऑटो क्लस्टर, रांका ज्वेलर्स, एम्पायर इस्टेट उड्डाणपूल लोहमार्गापर्यंत

पश्चिम - लोहमार्गापर्यंत

(लोकसंख्या - ३३,९१६)

प्रभाग क्र. : २० काळभोरनगर-अजंठानगर

व्याप्ती - काळभोरनगर, बजाज कंपनी, थरमॅक्स कंपनी, खडोबा मंदिर, रामनगर, विद्यानगर, दत्तनगर, अजंठानगर

चतु-सीमा : उत्तर - टिळक चौक निगडी, यमुनानगर रस्त्याने अजंठानगरपर्यंत, वरद हॉस्पिटल चिखली-आकुर्डी रस्त्यापर्यंत

पूर्व - कस्तुरी मार्केट, थरमॅक्स चौकापर्यंत, कमलनयन बजाज स्कूल, टाटा ॲंटोकॉम्प पासून नाल्यापर्यंत

दक्षिण - स्टार इंजिनियरपासून फुले उद्यानापर्यंत, दातीर पाटील रस्त्याने केंब्रिज स्कूल रस्ता, मेहता हॉस्पिटलपासून लोहमार्गापर्यंत

पश्चिम - लोहमार्ग, पांढारकर वस्ती एसटीपी, आकुर्डी हॉस्पिटल, म्हाळसाकांत विद्यालय शितळादेवी चौक पानसरे शाळा टिळक चौकापर्यंत

(लोकसंख्या - ३६,५८८)

प्रभाग क्र. : २१ आकुर्डी

व्याप्ती - गावठाण, गंगानगर, दत्तवाडी, लोकमान्य परिसर

चतु-सीमा : उत्तर - रणधीर मार्गापासून महापालिका नर्सरी, लोकमान्य हॉस्पिटल गायत्री ग्रेस, सेंट्रल बॅँकेपर्यंत टिळक चौकापर्यंत

पूर्व - टिळक चौकातून पानसरे शाळा आकुर्डीपर्यंत, म्हाळसाकांत रस्त्याने पांढारकर वस्ती एसटीपी, गंगानगर रस्त्याने लोहमार्गापर्यंत

दक्षिण - लोहमार्ग

पश्चिम - सावरकर रस्त्याने म्हाळसाकांत व विसावा चौक ओलांडून सावरकर चौकापर्यंत, निगडी रोप वाटिका, रणधीर रस्त्यापर्यंत

(लोकसंख्या -४०,०८५)

प्रभाग क्र. : २२ ओटास्कीम-निगडी

व्याप्ती - ओटास्कीम-निगडी गावठाण, साईनाथनगर, सिद्धार्थनगर

चतु-सीमा : उत्तर - देहूरोड कॅन्टोमेन्ट हद्दीपासून निगडी-तळवडे शीव साईमंदिर व बुद्ध विहार, स्वामी विवेकानंद शाळेला जाणारा रस्ता

पूर्व - श्रीराम इंजिनिअरिंग वर्क्स गुरूदत्त सोसायटीस दलवाईनगर, गुरूदत्त उद्यान, स्पाईन रस्ता ते जानकीबाई आंबेडकर हेडगेवार चौकापर्यंत

दक्षिण - निगडी टिळक चौकापासून मुंबई-पुणे रस्त्याने भक्ती शक्ती उद्यानाजवळील मनपा हद्द व देहूरोड कॅन्टोमेन्ट हद्द.

पश्चिम - महापालिका व देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्द

(लोकसंख्या -३७,७३८)

प्रभाग क्र. : २३ वाहतूकनगरी- भक्तिशक्ती

व्याप्ती - वाहतूकनगरी, भक्ती-शक्ती परिसर, सेक्टर २४, २५, २६, २७, केंद्रीय वसाहत.

चतु-सीमा : उत्तर - महापालिका व देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्द

पूर्व - महापालिका हद्दीपासून निगडी बस डेपो व भक्ती-शक्ती चौक, लोकमान्य हॉस्पिटल ते रोपवाटिका, म्हाळसाकांत चौक.

दक्षिण - लोहमार्ग

पश्चिम - लोहमार्ग, महापालिका हद्द व देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्द

(लोकसंख्या -३६,९४७)

प्रभाग क्र. : २४ मामुर्डी -विकासनगर

व्याप्ती - मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत

चतु-सीमा : उत्तर - महापालिका व देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्द, लोहमार्ग

पूर्व - महापालिका हद्द, लोहमार्ग, राजलक्ष्मी ग्रीन्स सोसायटी ते औंध -रावेत बीआरटी रस्ता (बास्केट ब्रीज)

दक्षिण - पवना नदी

पश्चिम - महापालिका हद्द

(लोकसंख्या -३८,७७९)

प्रभाग क्र. : २५ वाल्हेकरवाडी-गुरुद्वारा

व्याप्ती - वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, डीवाय पाटील कॉलेज, शिंदे वस्ती

चतु-सीमा : उत्तर - लोहमार्ग

पूर्व - अश्‍विनी हॉस्पिटललगत लोहमार्ग ते ओम चौक, बिजलीनगर, जनरल बिपिन रावत पुलापर्यंत ते पंपिग स्‍टेशन

दक्षिण - पवना नदी

पश्चिम - रावेत बास्केट ब्रीज ते औंध-रावेत बीआरटी रस्ता, राजलक्ष्मी ग्रीन्स जवळील नाला, लोहमार्गापर्यंत

(लोकसंख्या- ३९,५३१)

प्रभाग क्र. : २६ बिजलीनगर-दळवीनगर

व्याप्ती - बिजलीनगर , दळवीनगर, भोईरनगर, इंदिरानगर, चिंचवडेनगर.

चतु-सीमा : उत्तर - आकुर्डी-चिखली स्पाईन रोड ते ओम चौक, अश्‍विनी हॉस्पिटल ते सोपानराव भोईर रेल्वे पुलापर्यंत

पूर्व - चिंचवड रस्‍त्याने नक्षत्रम सोसायटी, साई कॅफे, प्रेमलोक पार्क, पद्मजा हॉस्पिटल, फत्तेचंद कॉलेज, डांगे चौक, थेरगाव पुलापर्यंत

दक्षिण - पवना नदी

पश्चिम - केजूदेवी बोटकल्ब पवना नदीपासून उत्तरेस पंपिंग स्‍टेशन, रानमळ्यापासून वाल्हेकरवाडी रस्त्यापर्यंत, आकुर्डी चिखली स्पाईन रस्ता.

(लोकसंख्या- ३७,४२०)

प्रभाग क्र. : २७ चिंचवडगाव-उद्योगनगर

व्याप्ती - चिंचवडगाव, उद्योगनगर, क्विन्सटाऊन सोसायटी, टेल्को कंपनी, प्रेमलोक पार्क, एसकेएफ कंपनी, रस्टन कंपनी, मोरे प्रेक्षागृह.

चतु-सीमा : उत्तर - सोपानराव भोईर रेल्वे पुलापासून लोहमार्ग ते साईबाबानगर झोपटपट्टीलगतच्या लोहमार्गापर्यंत

पूर्व - साईबाबानगर रेल्वेस्‍टेशनपासून ते संतोषनगर, चिंचवड लोकमान्य हॉस्पिटल पूल, धोका कॉलनी, जीवननगर सुखवानी व्हिला, चित्तराव गणपती

दक्षिण - पवना नदी

पश्चिम - थेरगाव पूल, जुना जकात नाका, पद्मजा हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी चौक, प्रेमलोक पार्क, नक्षत्रम सोसायटी, साई कॅफे, सोपानराव भोईर लोहमार्गापर्यंत

(लोकसंख्या- ३८,७२७)

प्रभाग क्र. : २८ केशवनगर - मोरया राज पार्क

व्याप्ती - केशवनगर, मोरया राज पार्क, लक्ष्मी नगर, यशोपुरम, श्रीधरनगर

चतु-सीमा : उत्तर - रेल्वे लाईन

पूर्व - मदर तेरेसा फ्लाय ओव्हर रेल्वे लाईनपासून ते काळेवाडी रस्त्याने पवना नदीपर्यंत

दक्षिण - पवना नदी.

पश्चिम - काळेवाडी रस्त्याने शहीद कामठे चौक, पिंपरी लिंक रोड, स्वामी विवेकानंद चौक, संतोष नगर, साईबाबा झोपडपट्टी रेल्वे लाईनपर्यंत

(लोकसंख्या- ३९,७५३)

प्रभाग क्र. : २९ भाटनगर - मिलिंदनगर

व्याप्ती - भाटनगर, मिलिंदनगर, पिंपरी कॅम्प, जिजामाता हॉस्पिटल

चतु-सीमा : उत्तर - एम्पायर इस्टेट फ्‍लाय ओव्हर रेल्वेलाइनपासून ते शनी मंदिर चौक पिंपरीलगत रेल्वे लाईनपर्यंत

पूर्व - शनी मंदिर चौक रस्ता, साई चौक, जवाहरलाल नेहरू रस्ता, गेलॉर्ड चौक, साईसागर स्टील यार्ड साधू वासवानी रस्त्यापर्यंत

दक्षिण - साईसागर स्टील यार्ड साधू वासवानी रस्ता, मानडेअरी, वैभवनगर, एम.सी.जी क्रिकेट ॲकडेमीपर्यंत

पश्चिम - एम.सी.जी क्रिकेट ॲकडेमी, मदर तेरेसा फ्‍लाय ओव्हरपर्यत व एम्‍पायर इस्टेट फ्‍लाय ओव्हर रेल्वे लाईनपर्यंत.

(लोकसंख्या- ३९०३६)

प्रभाग क्र. : ३० पिंपरीगाव - पिंपरी कॅम्प

व्याप्ती - पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प, अशोक थिएटर परिसर, सावतामाळी नगर, वैभवनगर.

चतु-सीमा : उत्तर - रेल्वे लाईन

पूर्व - मनपा हद्द व पिंपरी मिलिटरी डेअरी फार्म हद्द. दक्षिण - पवना नदी.

पश्चिम - एम.सी.जी क्रिकेट ॲकडेमी, वैभवनगर, साधूवासवानी, साईसागर स्टील, जवाहरलाल नेहरू रस्ता, गेलॉर्ड चौक, शनी मंदिर चौक व उत्तरेस रेल्वे लाइन

(लोकसंख्या- ३८,९०६)

प्रभाग क्र. : ३१ काळेवाडी-नढेनगर

व्याप्ती - काळेवाडी, विजयनगर, नढेनगर, आदर्शनगर

चतु-सीमा :उत्तर - पवना नदी

पूर्व - पवना नदी

दक्षिण - राजवाडा लॉन्स, नढेनगर जयहिंद कॉलनी, भारतमाता चौक, पार्वती स्कूल रस्ता, ऑक्सिकेअर हॉस्पिटल रस्त्यापर्यंत.

पश्चिम - काळेवाडी मुख्य रस्ता पाचपीर चौकापर्यंत, आदर्श चौक, सोनिगरा विहार रस्त्याने धोनी स्टोअर्सपर्यंत, इंदू लॉन्स पवना नदीपर्यंत.

(लोकसंख्या : ३९,०६८)

प्रभाग क्र. : ३२ तापकीरनगर-रहाटणी

व्याप्ती - तापकीरनगर, रहाटणी, ज्योतिबानगर.

चतु-सीमा : उत्तर - काळेवाडी चिंचवड पुलापासून इंदू लॉन्सपर्यंत, आदर्शनगर, पाचपीर चौक, पार्वती शाळा, जयहिंद कॉलनी, राजवाडा लॉन्स व पवना नदीपर्यंत.

पूर्व - पवना नदी

दक्षिण - पिंपळे सौदागर महादेव मंदीर लगतच्या रस्त्याने रहाटणी मुख्य रस्त्याने मनपा रहाटणी शाळा लगत रस्त्याने बळीराज कॉलनीपर्यंत.

पश्चिम - बळीराज कॉलनी रस्त्याने पेट्रोल पंपापर्यंत, शारदा स्कूल व रोहित सोसायटी, बेबी शाळेपर्यंत, तापकीर चौक, एमएम कॉलेज पवना नदीपर्यंत.

(लोकसंख्या : ३३,५८४)

प्रभाग क्र. : ३३ रहाटणी-रामनगर

व्याप्ती - रहाटणी, रामनगर, फाईव्ह गार्डन, शिवतीर्थनगर, तापकीरनगर.

चतु-सीमा : उत्तर - तापकीर चौक, हॉटेल कुणाल, बेबी स्कूल, शारदा स्कूल, बळिराज कॉलनी, रहाटणी मनपा शाळा, रहाटणी चौकापर्यंत.

पूर्व - रहाटणी चौकातून कोकणे चौक ओलांडून बीआरटी रस्त्याने साई चौकाच्या औंध-रावेत बीआरटी रस्त्यापर्यंत.

दक्षिण - औंध-रावेत बीआरटी रस्त्यावरील साई चौकातून द वुड्स हौसिंग सोसायटी, शिवराजनगर रस्त्याने दयाल हाईट्स सोसायटीपर्यंत.

पश्चिम - दयाल सोसायटीपासून अमरदीप कॉलनी, सिध्दीविनायक, अष्टविनायक कॉलनी, कुणाल हॉटेल, तापकीर चौक, काळेवाडी मेन रोडपर्यंत.

(लोकसंख्या : ३७,५९१)

प्रभाग क्र. : ३४ बापुजीबुवानगर-आदिनाथ कॉलनी

व्याप्ती - बापुजीबुवानगर, शिवतीर्थनगर, आदिनाथ कॉलनी, अशोका सोसायटी, ज्ञानेश्वर कॉलनी

चतु-सीमा : उत्तर - थेरगाव रहाटणी रस्त्यावरील वेंगसरकर क्रिकेट ॲकडमी पासून काळेवाडी मुख्य रस्त्यापर्यंत.

पूर्व - तापकीर चौक, थोपटे रस्त्यापर्यंत, अष्टविनायक व सिद्धीविनायक कॉलनी, अमरदीप कॉलनी, द वुड्स सोसायटी, बीआरटी रस्त्यापर्यंत.

दक्षिण - वुड्स सोसायटी समोरील औंध-रावेत बीआरटी रस्ता, काळेवाडी फाटा चौक ओलांडून अशोका सोसायटी मुख्य रस्त्यापर्यंत.

पश्चिम - अंबिका मटण शॉपपासून अशोका सोसायटी रस्त्याने उत्तरेस वेंगसरकर क्रिकेट अकेडमी रस्त्याने थेरगाव रहाटणी रस्त्यापर्यंत.

(लोकसंख्या : ३४,०८५)

प्रभाग क्र. : ३५ थेरगाव, पडवळनगर, पवारनगर

व्याप्ती - थेरगाव, कुणाल रेसिडेन्सी, प्रसुनधाम, पडवळनगर, हनुमाननगर, बेलठिकानगर, पवारनगर.

चतु-सीमा :उत्तर - पवनानदी.

पूर्व - चिंचवड-काळेवाडी पुलापासून हेगडेवार रस्त्याने एमएम कॉलेज लगत रस्त्याने काळेवाडी मुख्य रस्ता व तापकीर चौकापर्यंत.

दक्षिण - तापकीर चौक, वेंगसरकर क्रिकेट ॲकडमी, अशोका सोसायटी, रावेत-औंध बीआरटी रस्त्यापर्यंत, सोळा नंबर बसस्टॉप साईकॉलनी

पश्चिम - साई कॉलनी, १६ नंबर स्टॉप, साईबाबा मंदिर, रहाटणी रस्ता, अक्षय सेंटर व गंगा-आशियाना, बिर्ला रुग्णालय, पवना नदीपर्यंत.

(लोकसंख्या : ३४,९५७)

प्रभाग क्र. : ३६ गणेशनगर-डांगे चौक

व्याप्ती - गणेशनगर, डांगे चौक, अरुण पार्क, संतोषनगर, पदमजी पेपर मिल, बिर्ला रुग्णालय परिसर.

चतु-सीमा : उत्तर - पवनानदी.

पूर्व - थेरगाव रहाटणी रस्ता, लक्ष्मणनगर, साईबाबा मंदिर, बीआरटी रस्त्यापर्यंत, संतोषनगर, १६ नंबर बस स्टॉप, थेरगाव रुग्णालय रस्ता

दक्षिण - थेरगाव रुग्णालयापासून जलतरण तलाव रस्त्याने पश्चिमेस थेरगाव वाकड रस्ता ओलांडून पंचशील कॉलनी रोड क्रमांक एक पर्यंत.

पश्चिम - पंचशील कॉलनी रोड क्रमांक एकपासून गणेश मंदिर, डांगे चौक, बीआरटी रस्त्याने ताथवडे थेरगाव शिवा व पवना नदीपर्यंत.

(लोकसंख्या : ३६,०८९)

प्रभाग क्र. : ३७ ताथवडे-पुनावळे

व्याप्ती - ताथवडे, पुनावळे, काळाखडक.

चतु-सीमा : उत्तर - पवनानदी.

पूर्व - पवना नदीपासून ताथवडे थेरगाव शिव, बीआरटी रस्त्याने डांगे चौक, भूमकर चौक रस्त्याने गणेशनगर, पंचशील रोड, बायपासपर्यंत.

दक्षिण - बायपास रस्त्याने उत्तरेस भूमकर चौक ओलांडून वाकड शनी मंदिर व बालाजी इन्स्टिट्यूट, इंदिरा कॉलेज रस्त्याने मनपा हद्दीपर्यंत.

पश्चिम - मनपा हद्द.

(लोकसंख्या : ३२,६६४)

प्रभाग क्र. : ३८ वाकड-भूमकर वस्ती

व्याप्ती - वाकड, भूमकर वस्ती, कस्पटे वस्ती, वाकडकर वस्ती.

चतु-सीमा : उत्तर - इंदिरा कॉलेज रस्त्याने बायपास रस्त्यापर्यंत, वेस्टर्न ऍव्हेन्यू, शिवनगर, अष्टविनायक कॉलनी, वाकड पोलिस ठाणे, ॲबियन्सपर्यंत.

पूर्व - काळेवाडी फाटा-कस्पटे वस्ती रस्ता, नाशिकफाटा ते वाकड बीआरटी रस्ता ओलांडून रॉयल फर्निचर लगत रस्त्याने मुळा नदीपर्यंत.

दक्षिण - मुळा नदी.

पश्चिम - मनपा हद्द.

(लोकसंख्या : ३४,८७३)

प्रभाग क्र. : ३९ पिंपळे निलख

व्याप्ती - पिंपळे निलख, रक्षक सोसायटी, भारत इलेक्ट्रॉनिक, विशालनगर, अण्णा भाऊ साठेनगर, वेणूनगर, पोलिस लाईन, कावेरीनगर.

चतु-सीमा : उत्तर - वाकड पोलिस ठाण्यापासून थेरगाव रुग्णालय, बारणे उद्यान, फ्लोरेन्स सोसायटी, बीआरटी रस्ता, काळेवाडी चौक, साई चौकापर्यंत.

पूर्व - मनपा हद्द.

दक्षिण - मुळा नदी.

पश्चिम - कस्पटे वस्ती रस्त्याने हॉटेल अँबियन्सपर्यंत, एनआरएस, साठेनगर रस्त्याने थेरगाव रस्त्यापर्यंत, वाकड पोलिस ठाण्यापर्यंत.

(लोकसंख्या- ३९,६५२ )

प्रभाग क्र. : ४० पिंपळे सौदागर

व्याप्ती - पिंपळे सौदागर, रोझ लॅन्ड, कुणाल आयकॉन, गणेशम, प्लॅनेट मिलेनियम.

चतु-सीमा : उत्तर - काळेवाडी रहाटणी रस्त्याने महादेव मंदिरापासून पिंपळे सौदागर पूल, क्रांती चौक, पिंपरी मिलिटरी डेअरी फार्म हद्दीपर्यंत.

पूर्व - महापालिका व मिलिटरी हद्द.

दक्षिण - महापालिका व मिलिटरी हद्द.

पश्चिम - नाशिक फाटा-वाकड बीआरटी रस्त्याने उत्तरेस कोकणे चौक ओलांडून काळेवाडी रहाटणी चौक रस्त्यापर्यंत.

(लोकसंख्या- ३७,९२०)

प्रभाग क्र. : ४१ जवळकरनगर

व्याप्ती - गावठाण, जवळकरनगर, कल्पतरू इस्टेट, वैदुवस्ती, वेस्ट साइड काउंटी, लक्ष्मीनगर

चतु-सीमा : उत्तर - पवना नदी

पूर्व - पवना नदी

दक्षिण - अमृता कॉलनीपासून ६० फुटी रस्ता, सुवर्ण पार्क ते दापोडी रस्ता, पिंपळे गुरव बस स्टॉप, जिजाऊ उद्यान कांकरिया गॅस पर्यंत

पश्चिम - महापालिका व मिलिटरी हद्द

(लोकसंख्या- ३४,०७१)

प्रभाग क्र. : ४२ कासारवाडी- फुगेवाडी

व्याप्ती - कासारवाडी, फुगेवाडी, कुंदननगर, वल्लभनगर

चतु-सीमा : उत्तर - एचए कंपनी लोहमार्ग पिंपरी गाव रस्त्याने डीवाय कॉलेजपर्यंत. संत तुकाराम मंदिर, फिलिप्स कॉर्नर, जिजाऊ कॉलेजपर्यंत

पूर्व - जिजाऊ कॉलेज रस्त्याने नाशिक महामार्ग, महापालिका, सीएमई हद्द

दक्षिण - फुगेवाडी छत्रपती चौक, साई सर्विस, स्वामी समर्थ मंदिर, लोहमार्ग, पवना नदीपर्यंत

पश्चिम - पवना नदी, महापालिका व लोहमार्ग हद्द

(लोकसंख्या- ३६,७५४)

प्रभाग क्र. : ४३ दापोडी

व्याप्ती - गावठाण, गणेशनगर, काटे रेसिडेन्सी, जयभीमनगर, महात्मा फुलेनगर

चतु-सीमा : उत्तर - पवना नदी लोहमार्ग, साई सर्विस, स्वामी समर्थ मंदिर, फुगेवाडी शिवाजी चौकापर्यंत, महापालिका व सीएमई हद्द

पूर्व - फुगेवाडी शिवाजी चौकापासून सीएमई महापालिका हद्द दक्षिणेस मुळा नदीपर्यंत

दक्षिण - मुळा नदी

पश्चिम - पवना नदी

(लोकसंख्या- ३९,२६६)

प्रभाग क्र. : ४४ पिंपळे गुरव

व्याप्ती - गावठाण, राजीव गांधीनगर, गुरुदत्तनगर, रामनगर, काशीदनगर, आदर्शनगर, मोरया पार्क, गंगोत्रीनगर, श्रीनगर

चतु-सीमा : उत्तर - मिलिटरी हद्दीपासून शिरोळे रस्ता, रामनगर कॉर्नर, जिजाऊ गार्डन, पीएमपी डेपो, ६० फुटी रस्ता, पवना नदीपर्यंत

पूर्व - पवना नदी

दक्षिण - नर्मदा गार्डनपासून कृष्णा चौकापर्यंत, तेथून काटे पूरम चौक, साईपुष्प व मयूर सोसायटी मिलिटरी हद्दीपर्यंत

पश्चिम - महापालिका व मिलिटरी हद्द

(लोकसंख्या- ४०,०३२)

प्रभाग क्र. : ४५ नवी सांगवी

व्याप्ती - नवी सांगवी, औंध हॉस्पिटल, किर्तीनगर, कृष्णानगर, विनायकनगर, गजानन महाराजनगर, नेताजीनगर

चतु-सीमा : उत्तर - साईपुष्प व मयूर सोसायटी, जिजाऊ मार्गाने काटे पूरम चौकापर्यंत, तेथून कृष्णा चौक व तेथून पवना नदीपर्यंत

पूर्व - पवना नदी

दक्षिण - होळकर घाट, पवना नदी, इंद्रप्रस्थ सोसायटी, साई चौक, गणेश मंदिरापर्यंत तेथील मिलिटरी हद्दीपर्यंत

पश्चिम - महापालिका व मिलिटरी हद्द

(लोकसंख्या- ३४,५२७)

प्रभाग क्र. : ४६ जुनी सांगवी

व्याप्ती - ममतानगर, एसटी कॉलनी, जयमालानगर, मधुबन, आदर्शनगर शितोळेनगर, ढोरेनगर

चतु-सीमा : उत्तर - मिलिटरी हद्दीपासून गणेश मंदिर रस्‍त्याने पवना नदीवरील होळकर घाटापर्यंत

पूर्व - पवना नदी

दक्षिण - मुळा नदी

पश्चिम - मिलिटरी हद्दीने पीडब्ल्यूडी रस्ता ओलांडून फेमस चौकापर्यंत

(लोकसंख्या- ४६,९७९ )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com